Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या हिट-चाट

‘मोगॅम्बो खुश हुआ..’ गुगलकडून अमरीश पुरी यांना अनोखी मानवंदना

Share

अनेक नकारात्मक भूमिकांनी अनेक हिंदी डायलॉगने अजरामर झालेल्या अमरीश पुरी यांच्या जयंतीदिनी गुगलनेही मानवंदना दिली आहे. त्यांचे अनोखे गुगल तयार करून ‘मोगॅम्बो खुश हुआ..’ या जगप्रसिद्ध संवादाची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे.

आज दिवंगत बॉलीवूड अभिनेते अमरीश पुरी यांची जयंती. यानिमित्ताने हे खास डूडल तयार करण्यात आले आहे. अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ साली पंजाबच्या जालंधरमध्ये झाला.

बॉलिवूडमध्ये १९७१ साली ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या अमरीश पुरी यांनी त्याआधी मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनयाची झलक दाखवून दिली होती.

अमरीश पुरी यांच्या नकारात्मक भूमिका सर्वात जास्त राहिल्या. त्यातूनच त्यांना नवी  ओळखदेखील मिळाली. त्यांच्या भूमिका नकारात्मक जरी होत्या तरीही ते हे चित्रपट सुपरहिट करत असत.  १२ जानेवारी २००५ साली त्यांचे निधन झाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!