Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

शिक्षकदिनी गुगलकडून तमाम शिक्षकांना डूडलद्वारे सलाम

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी

प्रत्येकाच्याच आयुष्यात शिक्षकाचे स्थान अग्रभागी असते. त्यांचा सन्मान आदर आणि गौरव करणारा दिवस म्हणून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा केला जातो.  गुगलने शिक्षकांना डुडलद्वारे खास शुभेच्छा दिल्या फळ्यासमोर उभा असलेला ऑक्टोपस विज्ञान, गणित, संगित, कला, भाषा, असे विविध विषय शिकवत असताना गुगल डुडलमध्ये ग्राफिक्सद्वारे दाखवण्यात आले आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन चा जन्मदिवस आणि स्मृतिदिन म्हणून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. ते एक उत्तम शिक्षक होते. 1909 ते 1948 असा 40 वर्ष त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून कार्यभार सांभाळला. सोबतच स्वतंत्र भारताचे ते पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.

1962 साली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती झाले तेव्हापासून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन साजरा होतो. या खास दिवशी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सरकारतर्फे सन्मान केला जातो.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!