Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

गुगलकडून प्राईड परेडचे अनोखे डूडल

Share

गुगलकडून नेहमीच अनोखे डूडल तयार करून मानवंदना देण्यात येते. आज गुगल गे (Gay), लेस्बियन (Lesbian), ट्रांसजेंडर (Trangender), बायसेक्सुएल (Bisexual) आणि क्वीर यांसारख्या लैंगितेला ओळखून त्यांना जगात विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे.

याबाबत गर्वाने या समुदायाकडून ५० वर्षांपासून प्राईड परेड घेतली जाते. या समुदायाचे लोक स्वत:च्या आनंदासाठी आणि मिळालेल्या स्थानाप्रती परेड काढतात. या परेडची सुरुवात न्यूयार्कमधुन झाली. विशेष म्हणजे, आज या परेडला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

यामुळेच हा परेड उत्सव गुगलने डूडलच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे गुगलने होमपेज वर LGBTQ+ प्राइडच्या नावावर खास डूडल बनवले आहे.

यामध्ये गूगल ने 7 स्लाइड्समध्ये समुदायाची प्राइड परेड (Celebrating 50 Years Of Pride)चा प्रवास अधोरेखित केला आहे. हा प्रवास ५० वर्षांचा असून या समुदायाची व्याप्ती कशाप्रकारे वाढत गेली हे दर्शिवण्यात आले आहे.

जून महिना या समुदायासाठी प्राईड मंथ म्हणून संबोधला जातो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!