Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कर्जतजवळ मालगाडी घसरली; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Share

मुंबई : प्रतिनिधी 

कर्जतजवळील घाट परिसरातील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या घटनेमुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून किमान दोन दिवस याठीकांची परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी लागतील अशी माहिती मिळते आहे.

या मालगाडीचे सहा ते आठ डबे घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबई-पुणे दरम्यान अधिक बस चालवण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारला केली आहे.


आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जामरुंग व ठाकूरवाडीजवळ मालगाडीचे डबे घसरले. रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मुंबईहून सुटणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, मुंबईहून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्या आहेत. लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!