गुडसशेडची साठवण क्षमता वाढवा

0

कोपरगाव (प्रतिनिधी)- कोपरगाव परिसरात औद्योगिकीकरण वाढते आहे. संजीवनी व कोळपेवाडी साखर कारखान्यांच्या साखरेबरोबरच कांदा, मका, सोयाबीन यासारखा शेतमाल येथुन अन्यत्र रेल्वे वॅगनद्वारे पाठविण्यांत येतो. कोपरगाव रेल्वेस्थानकावर सध्याच्या गुडशेडची साठवण क्षमता फक्त चार वॅगन असून ती 21 वॅगनपर्यंत करण्यांत येवुन गुडसशेड परिसराचे सर्व काँक्रीटीकरण व डांबरीकरण करून आधुनिकीकरण करण्यात येवुन गुडसशेड प्लॅटफार्मची लांबी वाढविण्यात यावी अशी मागणी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे केली आहे.

शिर्डी साईबाबा या आंतरराष्ट्रीय धार्मीकस्थळांस रविवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी भेट दिली असता त्यांची श्री. कोल्हे यांनी भेट घेवुन कोपरगाव रेल्वेस्थानकाच्या विविध मागण्यांसदंर्भात निवेदन सादर केले. याप्रसंगी संजीवनी कारखान्यांचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाच्यावतींने मंत्री प्रभु यांचा सपत्नीक सत्कार केला. साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, खा. सदाशिव लोखंडे व रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

निवेदनांत म्हटले आहे, साई शताब्दी सोहळा 2018 मध्ये आहे, तेंव्हा कोपरगाव रेल्वेस्थानकावर भाविकांच्या सोयीसाठी पुणे, नागपुर गरीब रथ, संपर्क क्रांती, पुणे हावडा, कालकासह सर्व हॉलीडे एक्सप्रेसला थांबा देण्यांत यावा, प्लॅटफार्म एक व दोन ला कव्हर शेड, पिण्यांसाठी पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, बुकस्टॉल, टॉयलेट सुविधा करून यात्रीनिवास बांधावे. त्याचप्रमाणे बेंगलोर, पुणे, हरिया एक्सप्रेस आठवड्यातुन तीनवेळेस सुरू करावी.

लो लेव्हल गुडस शेडचे डांबरीकरण काँक्रीटीकरण करावे, तसेच हमाल बांधवांसाठी स्वतंत्र आरामनिवासगृह बांधण्यांत यावे. तसेच शिंगणापुर चौकी भुयारी मार्गाच्या कामाचीही चौकशी केली. साई शताब्दी सोहळ्याचे औचित्य साधुन कोपरगाव रेल्वेस्थानकाचा दर्जा वाढवुन त्याप्रमाणांत सोयी सुविधा निर्माण कराव्या. त्यास रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे अधिकार्‍यांना त्याबाबत सुचना केल्या.

सहकाराच्या बादशाहची मागणी –  माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांना भेटल्याचा परमानंद रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना झाला. साईबाबा शिर्डी बैठक सभागृहात मंत्री प्रभु यांनी कोल्हेंच्या गळ्यात पडत सहकाराच्या बादशाहचे मागणी निवेदन आहे. तेंव्हा रेल्वे अधिकार्‍यांनो यावर योग्य ती कार्यवाही करावी असे प्रभु यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

LEAVE A REPLY

*