Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिककरांसाठी खुशखबर; राजधानी आता आठवड्यातून चार दिवस नाशिकमार्गे

Share

जानोरी | वार्ताहर

नाशिकहून नियमित दिल्लीवारी करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. यापुढे राजधानी एक्सप्रेसला नाशिकमार्गे आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची नियमित होणारी गैरसोय टळणार असून कमी वेळेत प्रवाशांचा दिल्ली वारी करता येणार आहे.

देवळाली आणि नाशिक मतदार संघातील प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा करून ही गाडी चार दिवस सुरु करवून घेतल्याची माहिती दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली.

जून 2019 रोजी खासदार हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मुंबई सीएसटीएमहून हजरत निजामुद्दीनला जाणारी 22 221, 22 222 राजधानी एक्सप्रेस आठवड्यातील सर्व दिवस प्रवाशांच्या सेवेत सुरू करावी व ती मनमाड स्टेशनला थांबावी याकरिता मागणी केली होती.

राजधानी एक्सप्रेस हप्त्यातून दोन वेळा म्हणजेच मुंबईहून बुधवारी आणि शनिवारी व हजरत निजामुद्दीनहून गुरुवारी आणि रविवारी अशी सुरू होती.

इतर दिवस प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याकारणाने तसेच प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करता सदर एक्सप्रेसला दररोज प्रवाशांच्या सेवेत सुरू करावी व त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मनमाड जंक्शनवर देखील तिला थांबा मिळावा जेणेकरून दिंडोरी मतदार संघातील प्रवाशांचा दिल्लीला जाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.

त्याअनुषंगाने मुंबई ते दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावणारी प्रीमियम राजधानी एक्सप्रेस आता चार दिवस प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे खा.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या गाडीला मुंबईसह जळगाव आणि भोपाळ येथील प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने मध्यरेल्वेने हा निर्णय घेतला असल्याचे देखील सांगितले.

जानेवारी महिन्यापासून मुंबई ते दिल्ली दरम्यान राजधानी एक्सप्रेस सुरू करण्यात आली असताना ती आठवड्यातून दोनच दिवस मुंबई ते दिल्ली प्रवासाचे अंतर 20 तासांत पार करत होती मात्र पुल – पुश तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यानंतर हे अंतर 20 तासाहून अवघ्या 16 तासांवर आले होते.

परिणामी कमी खर्चात आणि कमी वेळेत मुंबईसह नाशिक – मनमाड – जळगाव आणि भोपाळकरांना सहज शक्य झाले होते. त्यामुळे या मार्गावरील राजधानी एक्सप्रेस च्या फेऱ्यात वाढ होण्याची गरज निर्माण झाली होती. परंतु, रेक अभावी हे काम रखडले गेले होते तेच काम पश्चिम रेल्वेकडून नुकतेच 20 कोचचा रेक मध्यरेल्वेला उपलब्ध झाल्याने राजधानीच्या फेऱ्यात वाढ होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून पुढील पंधरा दिवसांत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार असल्याचे खा.डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!