Type to search

Featured सार्वमत

शिर्डीचे उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांचा तडकाफडकी राजीनामा

Share

भूमिपूजनाच्या कार्यक्रम फलकावर ना. विखे यांचे नाव व फोटो न टाकल्याच्या कारणावरून निषेध करत

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – शिर्डी शहाराचा विकास झपाट्याने होत असून राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून शिर्डी शहराला केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला असताना आजच्या अग्निशमन केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी फलकावर नाव न टाकता जाणीवपूर्वक डावलल्याने शिर्डीच्या सत्ताधार्‍यांना ना. विखेंचा विसर पडला की काय, असा सवाल करीत तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी डॉ. सुजय विखे यांच्याकडे पाठविला आहे. नगर पंचायतीच्या सत्तेचे समीकरण बदलण्याच्या चर्चेला उधाण आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काल शनिवार 2 मार्च रोजी सकाळी शिर्डी नगरपंचायत मालकीच्या नांदुर्खी रोडलगत असलेल्या सर्वे नं. 126/4 मध्ये एक कोटी 82 लाख रुपये खर्चून अग्निशमन केंद्र व अग्निशमन कर्मचार्‍यांचे निवासस्थान बांधकाम कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा योगिता शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांच्यासह सत्ताधारी तसेच विरोधी गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सुजित गोंदकर यांनी शिर्डीच्या विकासात राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनखाली डॉ. सुजय विखे यांचे महत्त्वाचे योगदान असून या कार्यक्रमात त्यांचे नाव हेतुपुरस्सर डावलल्याचा आरोप करीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा डॉ. सुजय विखे यांच्याकडे सुपूर्द केल्यामुळे नगर पंचायतच्या सत्तेचे समीकरण बदलण्याची चर्चेला उधाण आले असून त्यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत निषेध व्यक्त केला आहे.

उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी पत्रात म्हटले आहे की शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत मी अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसच्या गटात अधिकृत सहभागी झालो. शिर्डी नगरपंचायतसाठी मागील दोन वर्षापासून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारकडून करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या माध्यमातून शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला आहे. शहर स्वच्छतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शहराच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना सरकार पातळीवर सुरू आहे. असे असले तरी नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे व कर्मचारी निवसास्थान भूमिपूजन कार्यक्रमाच्या ठिकाणी ना. विखे यांचे फलकावर फोटो व नाव नव्हते.

यावरून नगरपंचायतीमध्ये एकाधिकारशाही वाढीस लागली असून येथील जनता नाराज आहे. नगरपंचायतीचा कारभार करताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. चांगल्या कामाचे श्रेय प्रशासन स्वतः घेत असेल आणि ना. विखे यांचा विसर होत असेल तर उपनगराध्यक्ष पदावर काम करण्यात आपल्याला स्वारस्य नाही. आपल्या निदर्शनास आणून देत असून आपल्या नेतृत्वाचा मला सार्थ अभिमान असून भविष्यात शहरात आपले नेतृत्व वाढवण्यासाठी मी तन मन धनाने काम करण्यास कटिबद्ध असल्याचे सुजित गोंदकर यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

शिर्डी नगरपंचायत प्रशासनाकडून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव भूमिपूजन फलकावर अनावधानाने टाकणे राहून गेले आहे. उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांची शिर्डी शहराला गरज आहे. त्यांचे कौंटुबिक वाद आहे. मात्र शहरात त्यांचे चांगले काम आहे. नगरपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारची मनमानी होत नाही.
– योगिता शेळके, नगराध्यक्षा

गेल्या दीड वर्षापासून नगरपंचायतमधील सत्ताधारी गटाचे होतकरू उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक नाराज असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. सत्ताधारी गटाच्या नाराज असलेल्या नगरसेवकांना मी आवाहन करीत आहे की, आपल्या हातून शिर्डीचा विकास उत्तम करायचा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. सध्या राज्यात सेनेची सत्ता असून त्यांना चांगल्या पदावर काम करायची संधी मिळेल. काही नगरसेवक दबावाखाली काम करत असून त्यांना भाजपमध्ये तर काहीना शिवसेनेत येण्याची इच्छा आहे. त्यामुळे शिर्डीचा विकास शिवसेनेच्या माध्यमातून चांगला होईल याची ग्वाही देत भविष्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल,
– अनिता जगताप, शिवसेना नगरसेविका

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!