Thursday, May 2, 2024
Homeनगरगोंधवणीच्या तरुणाच्या गळफास प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

गोंधवणीच्या तरुणाच्या गळफास प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथील तरुणाने नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील त्याच्या सासुरवाडीस येऊन केलेल्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून मयताच्या पत्नीसह चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, गोंधवणी येथील रवींद्र ज्ञानदेव लबडे (वय 35) याने त्याच्या नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील सासुरवाडी येथे येऊन झाडाला गळफास घेऊन गुरुवारी आत्महत्या केली होती. त्याचा भाऊ किरण गोरक्षनाथ दांगट याने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. किरण दांगट हा मयत रवींद्र लबडेचा मोठा भाऊ असून तो 20 वर्षांपासून भेर्डापूर येथे त्याच्या मामाकडे दत्तक मुलगा म्हणून राहत असून तिथे शेती करत आहे. त्याचे मूळ नाव किरण ज्ञानदेव लबडे असे होते. किरण याने मयत भावाचा मोबाईल तपासल्यावर त्यात मृत्यूपूर्वी भावाने पाठविलेल्या मेसेजवरून या मृत्यूस चौघे जबाबदार असल्याची फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हटले की, 17 नोव्हेंबर रोजी भाऊ रवींद्र ज्ञानदेव लबडे याचा अंत्यविधी झाल्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी दुपारी माझा मयत भाऊ रवींद्र लबडे याचेकडे असणारा मोबाईल मी, भाऊ सुरेश ज्ञानदेव लबडे व चुलते सुभाष दशरथ लबडे असे आम्ही सर्वजण घरामध्ये मोबाईल पाहत असताना मोबाईलमध्ये गणेश धिरडे, शुभम पठाडे, पठाडे मामा, गौरव कांगुणे यांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबवरवर मयत भाऊ याने मरणापूर्वी माझे मृत्यूस व माझा आणि शितलचा सुखी संसार मोडण्यास कारणीभूत सुनील पठाडे, संगीता पठाडे, गणेश धिर्डे असल्याचे मॅसेज पाठवलेले दिसून आले. म्हणून माझी सुनील दत्तात्रय पठाडे, शितल रवींद्र लबडे, संगीता सुनील पठाडे (तिघेही रा. गोंडेगाव ता. नेवासा तसेच गणेश धिर्डे (पूर्ण नाव माहीत नाही) रा. बेलपिंपळगाव ता. नेवासा यांचेविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याची फिर्याद आहे.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी वरील चौघांवर भारतीय दंड विधान कलम 306, 34 प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या