Type to search

नाशिक

रायगड किल्ल्यावर ग्राम विकासासाठी गोंदे दुमालाच्या युवकांकडून संकल्प

Share

बेलगाव कुऱ्हे : लक्ष्मण सोनवणे

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना फक्त आश्वासन दिले जाते. निवडून आल्यानंतर मात्र दिलेल्या शब्दांचे तंतोतंत पालन कोणीही करीत नाही. मात्र, इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी मतदारांच्या शब्दाला जागण्यासाठी थेट रायगड किल्ल्यावर युवकांचे विचार जागवत शिवरायांना त्रिवार वंदन करीत ग्रामविकास करण्याचा संकल्प केला.

नुकत्याच पार पडलेल्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच गणपत जाधव यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनेलने घवघवीत यश मिळवले. थेट सरपंच म्हणून दादू सोनवणे विजयी झाले. ग्रामपंचायत सदस्य म्हणून गणपत जाधव, शोभा नाठे, सीताबाई नाठे, कृष्णा सोनवणे, परशराम नाठे, दीपिका नाठे, लिलाबाई नाठे हे विजयी झाले. विकास पॅनेलने गोंदे दुमाला गावात भरघोस विकास करण्यासाठी जनतेचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे.

त्यानुसार गावातील 120 तरुणांसह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी रायगड किल्ला सर केला. शिवरायांच्या विचारांचा जागर करून ग्रामविकास करण्याचा संकल्प तरुणांनी केला. शांतता, सौहार्दता, संयम, अभ्यास करून गावाला विकसित करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे नियोजन करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या गडकिल्ले मोहिमेतून सहकार्य मिळाले.

यावेळी हिरामण नाठे, अनिल सातपुते, विनोद जाधव, विनोद नाठे, अजय नाठे, सुनील नाठे, अमोल टर्ले, सुनील आहेर, बाळासाहेब सोनवणे, निलेश सोनवणे, राहुल खातळे, सागर नाठे, माधव नाठे, रवी नाठे, शिवराम जाधव, नितीन जाधव, नितीन सातपुते, शहाजी नाठे, शंकर नाठे, भाऊसाहेब बोडके, बाळासाहेब मेंगाळ, अमोल खरोटे, गणपत नाठे आदी युवक उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!