Type to search

Featured सार्वमत

सोन्याच्या भावानं गाठला उच्चांक

Share

नगरच्या बाजारात 33900 तोळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय बाजारात गुरूवारी सोन्याच्या भावानं पाच वर्षांमधला उच्चांक गाठला आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वधारले असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसला. नगरमध्ये सोन्याचा भाव प्रतितोळा 33900 इतका झाला.त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीला पसंती दिल्याचे दिसत आहे. आज गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या भावानं 39 डॉलर्स प्रति औंस अशी उसळी मारली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,387 डॉलर्स प्रति औंस झाला आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदर स्थिर ठेवताना येत्या काळात आर्थिक प्रगतीचा विचार करून निर्णय घेण्याचे घोषित केले.

त्यामुळे व्याजांचे दर कमी होण्याचे संकेत मिळाले व सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली. त्याचप्रमाणे अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळेही मे महिन्यात सोन्याच्या भावांनी आठ टक्क्यांची वाढ बघितली होती. भारतामध्ये दरवर्षी सुमारे 500 ते 600 टन इतक्या सोन्याची आयात होते. जर सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले तर परिणामी खरेदीत घट होऊन आयातही तुलनेने घटण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारातही गुरूवारी सकाळी या आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचे पडसाद उमटले असून सकाळी सोने व चांदी दोन्ही वधारले आहेत. नगरमध्ये एका झटक्यात सोन्याच्या भावाने 1 हजाराच्या वाढीचा टप्पा ओलांडत 33 हजार 900 वर उसळी मारली. सोन्याच्या भावात एकदम वाढ झाल्याने गुंतवणूकदारांनी पसंती दर्शविल्याचे सांगण्यात आले.

नगरात हायेस्ट
नगरमध्ये आजपर्यंत सोन्याचा भाव 33 हजाराच्या वरती कधीही गेला नव्हता. काल हा भाव 33 हजार 400 इतका होता. आज दुपारी झटकन 500 ची वाढ होऊन सोने 33 हजार 900 रुपये प्रति तोळा झाले. नगरमध्ये या भावाचा उच्चांक झाल्याची माहिती सराफ व्यावसायिक योगेश कुलथे यांनी दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!