Friday, May 3, 2024
Homeनगरग्रामपंचायत पोटनिवडणूक निकाल जाहीर

ग्रामपंचायत पोटनिवडणूक निकाल जाहीर

राहाता (तालुका प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचा पोटनिवडणूकीचा निकाल जाहिर झाला आहे. लोणी खुर्दला प्रभावती घोगरे, हसनापूरला कुसूम बर्डे, तर गोगलगावला सुरेश ठोके विजयी झाले आहेत.

- Advertisement -

आज सकाळी १0 वाजता राहाता तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. काही वेळेत तीनही जागांचे निकाल जाहिर झाले. गोगलगाव व हसनापूर या ग्रामपंचायतीतील जागा विखे पाटील समर्थकांना मिळाल्या तर लोणी खुर्दची जागा घोगरे गटाने राखली आहे.

लोणी खुर्द

किरण प्रभाकर आहेर – १२४८ मते (विखे गट ), प्रभावती जनार्दन घोगरे – १४२८ (विजयी घोगरे गट)

हसनापूर

कुसूम भाऊसाहेब बर्डे – २६४ (विजयी), सुनिल जनार्दन माळी – १७०.

गोगलगाव

कारभारी दगडू राउत – ६१, सुरेश पुंजा ठोके – १४७ (विजयी), सोमनाथ शंकर पगारे – ११६

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार कुंदन हिरे यांनी काम पहिले. त्यांना नायब तहसीलदार भांगरे आदिनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या