गोदावरी संवर्धन कक्षासाठी आता कायमस्वरूपी कर्मचारी

आयुक्त अभिषेक कृष्णा यांची माहिती

0
नाशिक, ता.१७, प्रतिनिधी- गोदावरी स्वच्छ राखण्यासाठी महापालिकेकडून गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने आता गोदावरी संवर्धन कक्षासाठी कायमस्वरूपी ६० सफाई कर्मचारी नेमणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.
नदीच्या दोन्ही काठांपासून ५० मीटरच्या कक्षेत हे कर्मचारी काम करतील. शिवाय एकूण १४ किलोमीटरच्या गोदाघाट स्वच्छतेची जबाबदारी या कर्मचारयांवर असेल. याशिवाय एक विभागीय स्वच्छता अधिकारी तसेच उपविभागीय स्वच्छता अधिकारयांची नेमणूकही यासाठी केली जाणार आहे.

तसेच गोदाकाठी असलेल्या निर्मल्यकलशांसह आता नवीन जुना व सुका कचरा विभागणी असलेल्या नवीन बंदिस्त कचराकुंडया बसविण्यावरही महापालिका विचार करीत आहे. दरम्यान मंगळवारी महापौरांनी अचानक गोदाघाटची पाहणी केली.

त्यात अनेक स्वच्छता कर्मचारी गैरहजर आढळले तर काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात अस्वच्छता दिसली. याबाबत आरोग्य विभागाकडे दोन दिवसात अहवाल मागविण्यात आल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. तसेच गोदाघाट स्वच्छतेबाबत कर्मचारयांच्या कामाच्या विभागणीवरही विचार केला जाणार आहे.

गोदाघाटावरील अस्वच्छतेप्रश्‍नी गोदावरी संवर्धन कक्षाला कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्याची मागणी अनेक दिवसांपसून केली जात होती. परंतु आता त्यावर विचार करण्यात आला असून त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*