Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

गोदावरीत 53895 क्युसेकने विसर्ग

Share

धरणांच्या पाणलोटात, मुक्तपाणलोटात पावसाची मुसळधार

अस्तगाव (वार्ताहर) – बुधवारी रात्री नाशिकसह धरणांच्या पाणलोटात तसेच नांदूरमधमेश्‍वर बंधारा परिसरातील पाणलोटात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीतील नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातील विसर्ग गुरुवारी पहाटे 50 हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. तो काल सकाळी 10 वाजता 53895 पर्यंत पोहचला होता. त्यामुळे गोदावरीला पुन्हा पुराची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता.

बुधवारी रात्री सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह नाशिक, पिंपळगाव बसवंत, निफाड परिसरात मुसळधार पाउस झाला. त्यामुळे गोदावरीवरील नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बुधवारी रात्रीच गोदावरीतील विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. बुधवारी रात्री 2 वाजता नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरीत 44350 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. तासाभरात गुरुवारी पहाटे हा विसर्ग 50740 क्युसेकवर नेण्यात आला. हा विसर्ग गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत स्थिर होता.

तो तासाभराने सकाळी 10 वाजता 53895 क्युसेक इतका करण्यात आला. पावसाच्या पाण्याची आवक घटू लागल्याने दुपारी 12 वाजता पुन्हा हा विसर्ग 50740 क्युसेक वर आणण्यात आला. दुपारी 1 वाजता तो 33576 वर आणण्यात आला. 3 वाजता तो 23098 क्युसेक इतका करण्यात आला. तर सायंकाळी 6 वाजता तो 16788 क्युसेकवर स्थिर ठेवण्यात आला. रात्री 9 वाजता आवक वाढल्याने 23098 क्युसके विसर्ग करण्यात आला.

गोदावरीतून वाहिले तब्बल 105 टीएमसी पाणी!
नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे पावसाचे नविन येणारे पाणी विसर्गाच्या रुपाने जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतून धावते. 1 जून पासून काल 26 सप्टेंबर पर्यंत नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने तब्बल 1 लाख 5 हजार 32 दलघफू पाणी वाहिले. हे पाणी 105 टीएमसी इतके वाहिले. अजुनही विसर्ग सुरुच आहे. परतीच्या पावसाचा जोर ही टिकून आहे. त्यामुळे अजुनही पाणी गोदावरीतून वाहु शकते.

बुधवारी रात्री दारणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस झाला. दारणाच्या भिंतीजवळ 81, इगतपुरीला 25, भावली ला 51, घोटी येथे 46 मिमी पाऊस झाला. पाण्याची आवक होत असल्याने दारणातून काल पहाटे 5120 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. तो काल सायंकाळी 6 वाजता 3216 क्युसेकने सुरु होता. गंगापूर धरणाच्या पाणलोटात बुधवारी रात्री 5 इंचाहुन अधिक पाऊस पडला. तेथे 132 मिमी पाऊस नोंदला गेला. कश्यपीला 26, गौतमीला 50, त्रंबक येथे 17 तर अंबोली येथे 26 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणाच्या पाणलोटातील पावसामुळे बुंधवारी रात्री गंगापूर मधुन 1722 क्युसेकने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. नंतर तो सकाळी 8 वाजता 2284 क्युसेक इतका करण्यात आला. अन्य धरणातील विसर्ग असे- कडवा 2544 क्युसेक, आळंदी 687 क्युसेक, पालखेड 7000 क्युसेक, भोजापूर 539 क्युसेक, वालदेवी 1050 क्युसेक असा विसर्ग सुरु आहे.

गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाऊस असा- राहाता 67, शिर्डी 42, कोपरगाव 16, सोमठाणा 25, सोनेवाडी 27, रांजणगाव 48, चितळी 30, ब्राम्हणगाव 36, पढेगाव 20 मिमी असा पाऊस काल सकाळी संपलेल्या 24 तासांत नोंदला गेला. नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरीचा कालवा 412 क्युसेकने तर जलद कालवा 700 क्युसेक ने सुरु आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!