गोदावरीचा विसर्ग 6310 क्युसेकवर

0

विसर्ग घटले, दारणा 1100, गंगापूर 1040, वालदेवी 1050 

अस्तगाव (वार्ताहर)- काल दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने दारणा तसेच गंगापूर तसेच अन्य धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक घटल्याने यातील विसर्गही घटविण्यात आले आहेत. परिणामी नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येणारा विसर्गही 8938 क्युसेकवर आला आहे. त्यात काल रात्री 9 वाजता पुन्हा घट होऊन तो 6310 क्सुसेकवर आणण्यात आला आहे. जायकवाडीत मात्र काल सायंंकाळी 6 वाजता 26666 क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरुच होती. या धरणात यावेळी 61.21 टक्के उपयुक्त साठा तयार झाला होता.

तीन दिवसांच्या दमदार बॅटींग नंतर पावसाने काल विश्रांती घेतली होती. दारणाच्या भिंतीजवळ अवघा 4 मिमी पाऊस काल सकाळी संपलेल्या 24 तासांत नोंदला गेला. पाणलोटातील घोटी येथे 11, इगतपूरी येथे 15, तर भावली येथे 36 मिमी पावसाची नोंद झाली. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील धबधबे मात्र वाहत असल्याने या धरणात 24 तासात 320 दलघफू पाण्याची नवीन आवक झाली. दारणा 95.44 टक्के इतके भरले आहे. 7149 क्षमतेच्या या धरणात 6853 दलघफू पाणी साठा आहे. काल सकाळी या धरणातुन 1850 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. सकाळी 7 वाजेनंतर याचा विसर्ग काहिसा घटवित तो 1100 क्युसेकवर स्थिर ठेवण्यात आला आहे. या हंगामात 1 जुन पासून या धरणातून 13 टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

गंगापूर धरणाचा विसर्ग काल सकाळी 2600 क्युसेकने सुरु होता. तो काल दुपारी 12 वाजता 1040 इतका कमी करण्यात आला. त्यानतर तो स्थिर होता. हे धरण 91.88 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आले आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 5173 दलघफू पाणी साठा आहे. काश्यपीत 97.24 टक्के साठा आहे. त्यातून 200 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. गौतमी 98.89 टक्के भरले आहे. त्यातून 350 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत आहे. वालदेवी धरणातील 1050 क्युसेकने सुरु असलेला विसर्ग काल सकाळी 10 वाजेनंतर 598 क्युसेक इतका कमी करण्यात आला आहे. भोजापूर 300, आळंदी 243, पालखेड 380 असे विसर्ग सुरु आहेत.

नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येणारा विसर्ग काल 8938 क्युसेकने सुरु होता. तो पुन्हा काल मंगळवारी रात्री 9 वाजता 6310 क्सुसेक वर आणण्यात आला आहे. काल सकाळी 6 वाजे पर्यंत एक जुन पासून या बंधार्‍यातून गोदावरीत 4 लाख 74 हजार 738 क्युसेक इतके एकूण पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी 41टीएमसी इतके आहे. नदी व्यतिरिक्त या बंधार्‍यातून गोदावरीच्या उजव्या कालव्यासाठी 200 तर डाव्या कालव्यासाठी 100 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*