गोदावरीचे शेतीसाठी आवर्तन सोडा

0

राहाता तालुक्यातील लाभधारकांची मागणी

राहाता (तालुका प्रतिनिधी)– राहाता तालुक्यातील सोयाबीन, मका व इतर पिके सुकू लागल्याने शेतीसाठी तातडीने पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.  गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने सोयाबीन, मका, भाजीपाला, पेरूबागा पाण्याअभावी सुकू लागल्या असून ही पिके जगविण्यासाठी तातडीने गोदावरी कालव्याचे शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहे. पेरणी योग्य पाउस झाल्याने परिसरात शेतकर्‍यांनी शंभर टक्के परणी केल्या.

नंतरच्या पावसाने पिकेही जोमदार आली मात्र नंतर महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने फुलोर्‍यात आलेली पिके सुकू लागली. त्या पिकांना वेळीच पाणी न मिळाल्यास हाता तोंडी आलेला घास वाया जाण्याची भीती वाटत आहे. गोदावरी कालव्याच्या शेती आवर्तनाचा प्रश्न दरवर्षी रेंगाळला जातो. जेव्हा पिकांना पाण्याची गरज असते तेव्हा पाणी मिळत नाही मागील वर्षा ही अशीच स्थिती झाली होती वेळेत पाणी न मिळाल्याने केल्या वेळचा हंगाम वाया गेला होता तिच स्थिती यावेळी होऊ नये. धरणे भरलेली आहे सरकार व सिंचन विभागाने वेळेत नियोजन करण्याची गरज आहे. या कालव्यांचे पाणी नियोजन मंत्रालयातून होत असल्याने दिरंगाई होते लोकप्रतिनिधींनी त्यात लक्ष घालून नियोजन करावेे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

पाणी अर्जासाठी मुदत वाढवावी –
शेतीला पाणी देण्यापूर्वी सिंचन विभाग शेतकर्‍यांकडून पाणी अर्ज भरून घेते .मात्र यासाठी सातबारा उतारा सक्तीचा करते. राहाता तलाठी कार्यालयातून 7/12 उतारा मिळविने म्हणजे एक दिव्याला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन उतारे असल्याने व लिंक मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. तलाठ्याकडेे इतर गावांचा प्रभारी चार्ज असल्याने ते जागेवर सापडत नाहीत. त्यात सलग सुट्या आल्याने आठ दिवसांत अर्ज भरणे होणार नाही 16 ऑगस्ट पर्यंत असलेली मुदत आनखी आठ दिवस वाढवून द्यावी अभी मागणी शेतकरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

*