गोदावरीत 37445 क्युसेकने विसर्ग

0
पावसाचा जोर मंदावला, धरणातील विसर्ग सुरुच
अस्तगाव (वार्ताहर)- दारणा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी मध्यम स्वरुपाच्या श्रावण सरींचे आगमन दिवसभर होत आहे. काल सकाळी या धरणातून 9604 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. तो काल सायंकाळी 6 वाजता तो 3758 क्युसेकवर आला होता. गंगापूर धरणातून 5109 क्युसेकने विसर्ग सुरुच आहे. कडवा 1140 क्युसेक, आळंदी 1263, पालखेडमधून 5515 क्युसेक तर नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून काल सकाळी 6 वाजता सुरु असलेला 49478 क्युसेक विसर्ग सायंकाळी 37445 क्युसेकवर आला होता. खाली जायकवाडी धरणात उपयुक्त साठा काल सायंकाळी 6 वाजता 33 टिएमसी इतका झाला होता. हे धरण 42.15 टक्के भरले आहे.
गुरुवारी रात्रीनंतर पाउस नाशिक जिल्ह्यात दमदार बरसला होता. त्यामुळे गोदावरीचा विसर्ग जवळपास 50 हजारावर पोहचला होता. मात्र काल इगतपुरी, घोटी वगळता अन्यत्र पावसाचा जोर मंदावला होता. त्यामुळे नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने धरणातील विसर्ग घटविण्यात आले आहेत. दारणा धरण जवळपास 88 टक्के भरले आहे. 7149 क्षमतेच्या या धरणात 6290 दलघफु पाणी साठा तयार झाला आहे. इगतपुरी येथे काल सकाळी संपलेल्या 24 तासात 94 मिमि पावसाची नोंद झाली. घोटी येथे 90 मिमि पावसाची नोंद झाली.
दारणाच्या भिंतीजवळ 25 मिमि पावसाची नोंद झाली. त्यामुळे दारणात 697 दलघफू नवीन पाण्याची आवक या धरणात झाली. भावलीच्या भिंतीजवळ 97 मिमि पाउस झाला. भावलीत 75 दलघफू नवीन पाणी वाहून आले. हे धरण 100 टक्के भरले आहे. दारणात काल सकाळी 9604 क्ुयसेकने विसर्ग करण्यात येत होता. पावसाचा जोर कमी झाल्याने काल सायंकाळी 6 वाजता विसर्ग 3758 क्युसेकवर आला आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोटात गंगापूर येथे 184 मिमि पावसाची 24 तासात नोंद झाली. अंबोली येथे 80 मिमि, त्र्यंबक येथे 53 मिमी पावसाची नोंद झाली. काश्यपी येथे 82, गौतमी येथे 39 मिमि पावसाची नोंद झाली. काश्यपी धरणातून 650 तर गौतमी धरणातून 700 क्युसेकने विसर्ग करण्यात येत असल्याने गंगापूरमध्ये नव्याने पाणी दाखल होत असल्याने 5109 क्युसेकने विसर्ग होत आहे. हा विसर्ग काल उशीरापर्यंत टिकून होता. कडवा धरण 85.43 टक्के भरले आहे. मुकणे 58.17 टक्के भरले आहे. आळंदी 100 टक्के भरले आहे. काश्यपी 93.95 टक्के भरले आहे. गौतमी गोदावरी 93.52 टक्के भरले आहे.
नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने काल सकाळी 49478 क्ुयसेकने पाणी सोडण्यात येत होते. जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजेच्या आकडेवारी नुसार उपयुक्त साठा 33 टिएमसी इतका झाला होता. हे धरण 42.15 टक्के भरले होते. तर मृतसह एकुण साठा 59.1 टिएमसी इतका झाला आहे. काल सायंकाळी 6 वाजता या धरणात 44 हजार 100 क्युसेक प्रतितास याप्रमाणे पाण्याची आवक होत होती.

 

LEAVE A REPLY

*