गोदावरीतील विसर्ग 5639 क्युसेकवर

0

गंगापूरचा बंद दारणातून 2228 कडवातून 380 क्युसेकने विसर्ग

अस्तगाव (वार्ताहर)– नाशिक जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी इगतपुरी, घोटी परिसरात अधून मधून मध्यम स्वरुपाच्या श्रावण सरी बरसत आहेत. पाण्याची आवक घटल्याने दारणाचा विसर्ग 2228 क्युसेक वर आला आहे. गंगापूर धरणाचा विसर्ग बंद करण्यात आला आहे., कडवाचा 380 क्युसेक, वालदेवीचा 241, व आळंदीचा विसर्ग 243 क्युसेकने सोडण्यात येत आहे. पाऊस थांबल्याने धरणांचे विसर्ग घटल्याने नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात पाण्याची आवक घटल्याने या बंधार्‍यातून गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग 5 हजार 639 क्युसेकवर आला आहे.

या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल सकाळी 6 वाजे अखेर एकूण 23.2 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी सहा वाजता 39.25 टक्के उपयुक्त साठा झाला होता.
पावसाने विश्रांती घेतल्याने नविन पाण्याची आवक कमी झाली असल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आले आहेत. दारणात 84.68 टक्के पाणी साठा असून 7149 क्षमतेच्या धरणात 6054 दलघफु पाणी साठा आहे. काल सकाळ पर्यंत या धरणाच्या भिंतीजवळ 6 मिमि पाऊस झाला. काल दिवभर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. या धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 2228 पर्यंत खाली आला आहे. तर पाणलोटातील घोटी, इगतपुरी या परिसरात मध्यम स्वरुपाच्या सरी अधून मधुन बरसत होत्या. भावली धरण 100 टक्के भरले आहे. त्याच्या सांडव्यावरून 481 क्युसेकने विसर्ग होत आहे.

गंगापूर धरणात 76.18 टक्के पाणी साठा आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 4289 दलघफू पाणी साठा आहे. या धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग मंगळवारी रात्री 9 वाजता बंद करण्यात आला आहे. दिवसभर पावसाने या परिसरात विश्रांती घेतली होती. कडवात 85.36 टक्के साठा आहे. या धरणातून 380 क्ुयसेकने विसर्ग करण्यात येत आहे. काश्यपी धरणात 88.82 टक्के पाणीसाठा आहे. आळंदी धरणात 970 दलघफू पाणी असून हे धरण 100 टक्के भरले आहे. त्यातून 243 क्ुयसेकने विसर्ग सुरू आहे. वालदेवी धरणातून 241 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. हे धरणही 100 टक्के भरले असून 1133 दलघफू पाणीसाठा या धरणात आहे.

गौतमी गोदावरी धरण 83.10 टक्के भरले आहे. त्यात 1553 दलघफू पाणीसाठा आहे. मुकणे धरण 51.47 टक्के भरले आहे. यात 3726 दलघफू पाणीसाठा आहे.
नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात वरील धरणातून येणारे पाणी घटल्याने या बंधार्‍यातुन गोदावरीत करण्यात येणारा विसर्ग 5639 क्युसेकवर आला आहे. गोदावरीत या बंधार्‍यातून काल सकाळी 6 वाजे अखेर 23 हजार 286 दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी 23.2 टिएमसी इतके आहे. या बंधार्‍यातून गोदावरीचा उजवा कालवा 350 ने, डावा कालवा 150 ने तर जलद कालवा 600 क्युसेकने वाहत आहे.

जायकवाडीत 30 टिएमसी उपयुक्त साठा! –
जायकवाडी जलाशयात गोदावरीतील पाण्यामुळे उपयुक्त साठा वाढला आहे. काल सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार या धरणात उपयुक्त साठा 39.25 टक्के म्हणजेच 852.123 दलघमी इतका असुन म्हणजेच 30 टिएमसी पाणी साठा तयार झाला आहे. तर मृतसह एकूण साठा 1590.229 दलघमी इतका म्हणजेच 56.1 टिएमसी पाणीसाठा आहे. तर धरणात काल सायंकाळी 6 वाजता पाण्याची आवक 7350 क्युसेकने आवक होत होती.

LEAVE A REPLY

*