गोदावरीत 31322 क्युसेकने पाणी

0

अस्तगाव (वार्ताहर)- नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दारणा, गंगापूर व अन्य धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने गोदावरी नदीतील विसर्ग दुपारपासूनच वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत.

दारणा धरणातून 1700 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पण गंगापूर धरणातून पाणी कमी अधिक होत आहे. या धरणातून दुपारी 5116 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. दुपारी 4 वाजता विसर्ग 2874 क्युसेक करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा वाढविण्यात आला.

चित्रा नक्षत्रातील पावसाने सोमवारी नाशिक जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे नाशिक व परिसरातील ओढे नाले दुथडी भरून गोदावरीत दाखल होत होते. नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍याच्या पश्‍चिमेस नदी पात्रातून तसेच ओढे नाले यातून मोठे पाणी दाखल झाले.

सायंकाळी 6 वाजता 31322 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी आहे. काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. मुळा, प्रवरा आणि गोदावरीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने जायकवाडी धरणातही पाणी दाखल होत आहे.

LEAVE A REPLY

*