Type to search

Featured सार्वमत

गोदावरीचे पिण्याचे पाणी कडक बंदोबस्तात

Share
अस्तगाव (वार्ताहर)- गोदावरीच्या उजव्या तसेच डाव्या कालव्यातून बिगरसिंचनाचे आवर्तन सुरळीत सुरू राहण्यासाठी महसूल विभागाने तयार केलेली भरारी पथके कालव्यांवर गस्त घालीत आहेत. त्यामुळे पाणी चोरीला 90 टक्के आळा बसला असल्याने कालव्याच्या टेलला पूर्णक्षमतेने पाणी पोहचत आहे.

कालव्यातून अनधिकृत पाणी उपशावर निर्बंध घालण्यासाठी तसेच या हंगामातील हे शेवटचे बिगरसिंचनाचे आवर्तन आहे. पाऊस उशिराने होत असल्याने पिण्याचे पाण्याची गरज जुलै अखेर भागविण्यासाठी पूर्णक्षमतेने पाणी जलसाठ्यांपर्यंत पोहचले पाहिजे. या उद्देशाने ही पथके तयार करण्यात आली आहेत. गोदावरीच्या उजव्या तसेच डाव्या कालव्यांवर महसूल विभागाच्या पुढाकाराने पथके तयार करण्यात आली आहेत.

या भरारी पथकांमुळे पाणी चोरीला 90 टक्के नक्कीच आळा बसल्याचे जलसंपदाचे अधिकारी सांगतात. यामध्ये महसूल, पंचायत समिती, पोलीस, जलसंपदा व वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. रात्रंदिवस हे पथक गस्त घालत आहे.

उजव्या कालव्याचे पाणी सुरुवातीला टेल भागातील पुणतांबा बंधार्‍यात सोडण्यात आले. पुणतांबा तलाव भरल्याने गोंडेगाव, चितळी, जळगाव भागात पाणी सुरू आहे. त्यानंतर रामपूरवाडी भागात पाणी येईल. त्यानंतर त्यावरील गावातील तलाव भरण्याची प्रक्रिया सुरू असणाार आहे. डाव्या कालव्याचे पाणी वैजापूर शहरासाठी असणार्‍या साठवण तलावात सुरू आहे. हा तलाव कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका या गावाजवळ आहे. हा तलाव आज शुक्रवारी संध्याकाळी भरेल असा अंदाज आहे. त्यानंतर कोपरगावच्या तलावांमध्ये पाणी सोडले जाणार आहे. आज रात्री कोपरगावच्या साठवण तलावात पाणी सोडले जाईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!