कालच्या पावसाने गोदावरीला पुन्हा पूर

0

नाशिक, ता. ९ : नाशिक शहर आणि जिल्ह्यात काल दिवसभर आणि रात्रीही झालेल्या परतीच्या मुसळधार पावसानंतर गंगापूर धरण १०० टक्के भरले.

खबरदारीचा उपाय म्हणून गंगापूर धरणातून २२०० क्युसेक्स, ता दारणा धरणातून ७५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.

परिणामी आज सकाळी नाशिकच्या गोदाघाटावर पुरस्थिती असून रामकुंडासह रोकडोबा पटांगण, गौरी पटांगण या भागात पुराचे पाणी आहे.

LEAVE A REPLY

*