Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी; सतर्कतेचा इशारा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. सायंकाळी गोदावरी नदीच्या पुरात अधिक वाढ झाली. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

गोदावरी खोऱ्यातील सर्वच धरणे भरली असून प्रसंगावधान राखत धरणांतून विसर्ग केला जात आहे. आज सकाळी गंगापूर. दारणा, धरणातून वीस हजार पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गोदावरीसह दारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे.

Godavari River

अहिल्यादेवी होळकर (व्हिक्टोरिया पूल) पुलाखालून 20 हजार 375 क्युसेक पाण्याचा विसर्ग

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

गंगापूरमधून झालेला विसर्ग तसेच संततधार पावसामुळे गोदावरीच्या पाण्यात आणखी भर पडली. दुतोंड्या मारूती पाण्यात बुडाला आहे तर जवळपास सर्वच मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. सायखेड्यात गोदावरीच्या रौद्ररुपामुळे चांदोरी सायखेडा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

तसेच गंगेवर पूराचे पाणी येथील कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत आले आहे. त्यामुळे सरदार चौकापासून पुढे गोदाकाठालगतचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

गोदावरीचे रौद्ररूप

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

दरम्यान, गंगापूर 17748 क्यूसेस, गौतमी गोदावरी 6225 क्यूसेस, आनंदी 687 क्यूसेस, दारणा 23192 क्यूसेस, भावली 1509 क्यूसेस, वालदेवी 502 क्यूसेस, नांदूर मधमेश्वर 83773 क्यूसेस, पालखेड 6068 क्यूसेस, चनकापूर 7307 क्यूसेस, पुनद 2895 क्यूसेस, हरणबरी 56 क्यूसेस, होळकर पूल 20375 क्यूसेस   पाण्यचा विसर्ग होत आहे.

रामसेतू बुडाला; नाशिककरांची मोठी गर्दी

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

होळकर पुलावर होत असलेल्या २० हजार क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे गोदावारीने याठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे व परिसरात पुराचे पाणी शिरत असल्यास तात्काळ स्थलांतरित व्हावे व नदीकाठी, पुलावर गर्दी करू नये तसेच पूर बघण्यासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!