Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पाऊस थांबला, गोदावरीतील विसर्ग घटला

Share

अस्तगाव (वार्ताहर) –  दारणा, गंगापूर तसेच अन्य धरणांच्या पाणलोटातील जोरदार पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाच्या फक्त दिवसभर अधून मधून हलक्या सरी बरसत आहेत. भावलीच्या पाणलोटात काल मध्यम स्वरुपाचा पाऊस वगळता अन्यत्र 2 ते 11 मिमि असा पाऊस आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक घटल्याने विसर्ग कमी झाले आहेत. तर काही बंद झाले आहेत.

पाऊस थांबल्याने नांदूरमधमेश्‍वर पाण्याची आवक काहिशी घटली असून काल सायंकाळी गोदावरीतील विसर्ग 7 हजार 210 क्युसेकने सुरु होता. हा विसर्ग अजुनही कमी होऊ शकतो. या बंधार्‍यातून काल सकाळी 6 वाजेपर्यंत 1 जून पासुन 84.2 टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत झाला आहे.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाला अवघा 3, भावलीला 30, इगतपुरीला 8, घोटीला 9 मिमी, असा पाऊस नोंदला गेला. पाण्याची आवक घटली. त्यामुळे दारणाचा विसर्ग काल सकाळी 2564 क्युसेकने सुरु होता. तो काल सायंकाळी 6 ला 1100 क्युसेकवर आणण्यात आला. हा विसर्ग विद्युत प्रकल्पासाठीच्या गेटमधून सुरु आहे. या धरणाचे वक्राकार गेट बंद करण्यात आले आहे. ंभावलीतून 135 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

गंगापूरच्या पाणलोटातही पावसाची पावसाच्या हलक्या सरी बरसतात. गंगापुरला 5, कश्यपी 3, गौतमी 2, अंबोली 11 मिमी असा हलका पाऊस नोंदला गेला. काल दिवसभरही तुरळक स्वरुपाचा पाऊस अधूनमधून पडत होता. गंगापूरचा विसर्ग दोन दिवसांपूर्वीच बंद आहे. आळंदी धरणातून 340 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. पालखेड धरणातून काल सकाळी 10 वाजता 2283 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो नंतर दुपारी 4 नंतर 1522 क्युसेकवर आणण्यात आला.

नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतील विसर्गात घट होत आहे. वरील धरणातील पाण्याची आवक घटल्याने गोदावरीतील विसर्ग घटत चालला आहे. काल सकाळी 6 वाजता 11 हजार 192 क्युसेकने सुरु असलेला विसर्ग दुपारी 3 वाजता 8751 क्युसेकवर आणण्यात आला. त्यानंतर 6 वाजता तो 7210 क्युसेकवर

आणण्यात आला. काल सकाळी 6 वाजेपर्यंत गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने या बंधार्‍यातून एकूण 84.2टीएमसी इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

धरणातील एकूण विसर्ग
1 जूनपासून धरणांमधून झालेले एकूण विसर्ग टीएमसी मध्ये असे- दारणा 20.4 टीएमसी, गंगापूर 10.2 टीएमसी, कडवा 7.1 टीएमसी, मुकणे 0.2 टिएमसी, भोजापूर 1.2 टीएमसी, आळंदी 1.6 टीएमसी, कश्यपी 1.1 टीएमसी, वालदेवी 1.4 टीएमसी, गौतमी 1.4 टीएमसी, भावली 1.2 टीएमसी असे पाणी या धरणातून वाहुन गेले.
धरणातील साठे असे- दारणा 91.93 टक्के, भावली 100 टक्के, गंगापूर 91.01 टक्के, वाकी 87.7 टक्के, भाम 100 टक्के, कश्यपी 97.62 टक्के, आळंदी 100 टक्के, मुकणे 94.47 टक्के, वालदेवी 100 टक्के, कडवा 94.07 टक्के, भोजापूर 100 टक्के, करंजवन 93.89 टक्के, पालखेड 70.41 टक्के, ओझरखेड 100 टक्के, वाघाड 100 टक्के, असे धरणांमध्ये काल सकाळी 6 च्या आकडेवारी नुसार साठे आहेत.
जायकवाडीत 14635 क्युसेकने आवक
जायकवाडी धरणात काल रात्री 9 च्या आकडेवारी नुसार 91.02 टक्के पाणीसाठा झाला होता. उपयुक्तसाठा 69.7 टीएमसी इतका झाला आहे. तर मृतसह एकूण साठा 95.8 टीएमसी इतका झाला आहे. उपयुक्त साठा 76 टीएमसी झाल्यानंतर हे धरण 100 टक्के भरेल. या जलाशयात काल रात्री 9 वाजता 14635 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. या जलाशयातून जायकवाडीचा उजवा कालवा 900 क्युसेकने तर डावा कालवा 800 क्युसेकने वाहत आहे. तर जलविद्युत प्रकल्पातून 1589 क्युसेकने पाणी नदीत सोडले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!