Photo Gallery : गोदामाईच्या प्रवाहाला उधाण

0

नाशिक | काल रात्रीपासून गोदावरीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. आज तर सकाळपासून टप्प्याटप्प्याने प्रशासनाकडून गोदावरीत पाणी सोडण्यात आले. आज दुपारी सर्वात जास्त बारा हजार क्युसेस पाणी गोदावरीत सोडण्यात आले.

पाण्यामुळे गोदाघातावरील अनेक मंदिरे बुडाली, रामसेतू पुलाला पाणी लागले. पाण्याची पातळी वाढल्याची वार्ता शहरात पसरताच हजारो नाशिककरांनी आज गोदाघाटावर हजेरी लावली.

अजून पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. गोदावरी नदी परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पुराच्या पाण्यात वाहने चालवू नका, पूर पाहण्यासाठी गर्दी करू नका, तसेच आपत्तीच्यावेळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गोदाघाटावरील मनोहारी दृश्ये आमचे छायाचित्रकार सतीश देवगिरे यांनी टिपले आहेत.

LEAVE A REPLY

*