दोन तरुणांना गोदावरीत जलसमाधी

0
सार्थक लांडे
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – शहरातील एसएसजीएम महाविद्यालयात 12 वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेले चार विद्यार्थी हिंगणी येथील बंधावर्‍यावर गोदावरीच्या प्रवाहात आंंघोळीसाठी गेले होते. त्यातील सार्थक किशोर सोनवणे (रा. निवारा सोसायटी) आणी सार्थक संतोष लांडे (रा. लक्ष्मीनगर) हे दोन विद्यार्थी पाण्यात बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे.
एसएसजीएम महाविद्यालयात 12 वी वाणिज्य शाखेत असलेल्या चार विद्यार्थ्यांनी कॉलेज सुटल्यानंतर हिंगणी बंधार्‍यावर अंघोळीसाठी जाण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे हे चार विद्यार्थी शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हिंगणी बंधार्‍यावर गेले. गोदावरी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडू लागले त्यापैकी दोघांनी आपला जीव वाचवण्यात यश मिळवले. परंतु सार्थक किशोर सोनवणे व सार्थक लांडे हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले.
या मुलांना वाचविण्यासाठी त्यांच्या मित्रांनी व आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा करून प्रयत्न केला; परंतु यश मिळाले नाही. दोघेही सार्थक नावाची ही मुले गोदावरी पात्रात वेगाने वहात असलेल्या पाण्यात वाहून गेली. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पालीस हेडकॉन्स्टेबल बाबर पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*