Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : गंगाआरतीच्या पार्श्वभूमीवर आजपासून नाशिकमध्येही नियमित गोदा आरती

Share
पंचवटी | वार्ताहर
शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी गोदा आरतीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर गोदा आरतीचा शुभारंभ गुरुवारी (दि.१९) सायंकाळी करण्यात आला. राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल तसेच जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते आरती करण्यात आली.
गंगा आरतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये गोदा आरती सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. यानंतर पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पाठपुरावा करून पर्यटन विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्फत निधी मंजूर करून घेतला होता.
मागील महिन्याच्या अखेरीस गोदा आरती सुरु करण्या संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव कार्यक्रम लांबणीवर पडला होता. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित असल्याने त्यांच्या हस्ते गोदा आरतीचा शुभारंभ करण्यात आला. या आरती करिता राज्य शासनाने २४ लाख रुपये मंजूर केले असून, रोज सायंकाळी ७ वाजता रामकुंडावर ही गोदा आरती करण्यात येणार आहे.
यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, देश विदेशातील लोकांची भावना होती की पर्यटन विभागाने काहीतरी वेगळे करायला हवे. याचवेळी नाशिक मध्ये गोदा आरती सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. याठिकाणी धर्मासाठी आणि आस्थेसाठी भाविक येत असल्याने पर्यटन विभागाने त्वरित  गोदावरी आरती साठी निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गंगा गोदावरी नदीची आरती करण्याचा मानस असल्याचे रावल यांनी सांगितले.
तसेच ही गोदारती यापुढे अखंड सुरु राहील यात कोणत्याही प्रकारे खंड पडणार नाही याची सर्वश्री जवाबदारी पुरोहित संघाची राहील असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
आरतीच्या सुरवातीस उपस्थित ब्रह्म वृंदांनी पौरोहित्य करीत वेद मंत्रांच्या उच्चारात पूजन केले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, भाजप पदाधिकारी सुनील बागुल, जळगावचे खा.उन्मेष पाटील, वसंत गिते, लक्ष्मण सावजी, विजय साने, सोनालीराजे पवार, महेश हिरे, काळाराम मंदिराचे विश्वथ पांडुरंग बोडके, नगरसेविका प्रियंका माने, शिवाजी गांगुर्डे, धनंजय माने, पद्माकर पाटील, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!