बोलठाणमध्ये चोरांचा सूळसुळाट; २ महिन्यात २५ बकऱ्यांची चोरी

0
बोलठाण (निलेश दायमा) |   गेल्या अनेक दिवसांपासून बोलठाणमध्ये बकरी चोरांनी धुमाकूळ घातला असून गेल्या दोन महिन्यात जवळपास २५ बकऱ्या चोरीला गेल्या आहेत.  दोन दिवसांपूर्वी   येथील एका शेतकऱ्याच्या ११ बकऱ्या चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे येथील शेतकरी भयभीत झाले असून चोरांचा बंदोबस्त करण्याचीमागणी केली जात आहे.

१४ नोव्हेंबर ला क्ययूम शेख यांची एक बकरी, हमीद अब्दुल शहा यांच्या 3, सलाम टेलर यांची 1, राजू चाके यांच्या 2, नसिर पिंजारी यांची 1 आणि अजून एका इसमाच्या 3 बकऱ्या चोरी गेल्या.

गेल्या महिन्यात हनिफ शहा यांच्या  6, इसाक शेख 2, शकील सैय्यद 2 बकऱ्या चोरीला गेल्या होत्या. यातील काही नागरिकांनी पोलीस ठाण्यात नांदगावला फिर्याद दाखल केली होती. मात्र तपास न लागल्यामुळे आता कोणीही तक्रार करण्यास रस दाखवत नाही.

व्यापाराचे महत्वाचे ठिकाण म्हणून बोलठाण ओळखले जाते. बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त असते. बाजाराच्या दिवशी ग्राहकांचे मोबाईल चोरीला जाने, पाकीटमारी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सपशेल फेल झालेली दिसून येते.

बोलठाण येथे पोलीस आऊटपोस्ट असून त्यात अवघे तीन कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. तिघांना परिसर सांभाळणे मुश्कील होते. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची याठिकाणी नेमणूक करावी अशी मागणीदेखील ग्रामस्थांकडून केली जाते आहे.

LEAVE A REPLY

*