शेळीपालनाची 218 शेतकर्‍यांना संधी

0
9 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव करण्याची मूदत

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तालय यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेर्तंगत शेळी पालन योजनेत यंदा 215 लाभार्थींना लाभ मिळणार आहे. यासाठी लाभार्थ्यांकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी होवून ड्रॉ पध्दतीने लाभार्थीयांची निवड करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये 10 शेळी एक बोकड देण्यात आहे.
सर्वसाधारण व मागासवर्गियांसाठी अपंग व अकोले तालुक्यातील आदिवासी (टीएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील (ओटीएसपी) यासाठी स्वतंत्र शेळी गट वाटप करण्यात येणार आहे. खुला प्रवर्ग व अपंग लाभार्थीयांना 50 टक्के व मागासवगीर्र्य लाभार्थीयांसाठी 75 टक्के अनुदान मिळणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी 10 जुलै ते 9 ऑगस्टपर्यर्ंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.
10 ते 16 ऑगस्ट दरम्यान तालुकास्तरावरुन छाननी करुन प्रवर्गनिहाय याद्या जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या निवड समिती सदस्यांच्या उपस्थित सोडतपध्दतीने लाभार्थीयांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. गतवर्षी 152 गट वाटपाचे उद्दिष्टे होते.

लाभार्थ्यांना शेळी अनुदान अनुदान वितरणारणापुर्वी योजनेच्या अंमलबजावणीनूसार गोठ्याचे बांधकाम, वस्तु खरेदी ही स्वत:च्या खर्चातून करावी लागणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त, डॉ.ठवाळ व पशुधन पर्यवेक्षक डॉ.कांबळे यांनी दिली.
…………
सर्वसाधारण व मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण 172 शेळी गट वाटपाचे तालुकानिहाय उद्दिष्टे – नगर,राहाता प्रत्येकी 15, राहुरी-14, श्रीरामपूर, कर्जत प्रत्येकी 12, नेवासा, श्रीगोंेदा प्रत्येकी 16, शेवगाव-10, पाथर्डी, पारनेर प्रत्येकी 9, जामखेड-6, अकोले-8, संगमनेर-17, कोपरगाव 13 आदी. याशिवाय तीन अपंग व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. टीएसपी व ओटीएसपी 43 आदी. …………..

यंदा नाविन्यपूर्ण एक हजार कुक्कुट पक्षी योजनेतर्ंगत जिल्ह्यात सर्वसाधारण व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 69 व 1 अपंग लाभार्थी निवडीचे उद्दिष्टे आहे. नगर, राहाता, नेवासा, श्रीगोंदा प्रत्येकी 6, राहुरी, श्रीरामपूर,कोपरगाव प्रत्येकी 5, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, पारनेर, अकोले प्रत्येकी 4, जामखेड-3 व संगमनेर-7 आदी.याशिवाय 1 अपंग अशा एकूण 70 तसेच अकोले तालुक्यातील आदिवासी (टीएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील (ओटीएसपी)साठी 22 लक्षांक आहे.
………….

LEAVE A REPLY

*