उत्कृष्ट पर्यटनात गोवा देशातील तिसरे राज्य

0
पणजी | जगातील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या गोवा पर्यटनाला वर्षाअखेरीस आनंदाची बातमी मिळाली आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल आणि टुरिझम कौन्सिल-इंडिया इनिशिएटिव (डब्ल्यूटीटीसी-II) सह संलग्नितपणे पर्यटनासाठी करण्यात आलेल्या द्वैवार्षिक हॉटेलिवेट स्टेट रँकिंग सर्वेक्षणात  पाच राज्यांच्या यादीत गोव्याचा तिसरा क्रमांक लागला आहे.

दिल्ली आणि महाराष्ट्र ही राज्ये पहिल्या दोन क्रमांकावर असून, गोवा तिसऱ्या क्रमांकावर, तर तमिळनाडू आणि गुजरातचा पाठोपाठ क्रमांक लागला आहे.

हॉस्पिटॅलिटी उद्योगक्षेत्रातील 11 महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार या सर्वेक्षणात करण्यात आला होता. यात पर्यटनातील राज्याचा खर्च, पर्यटकांची संख्या, ब्रँडेड हॉटेल्सची संख्या, प्रति कॅपिटल जीएसडीपी दर, एअरक्राफ्ट मूव्हमेंट, व्यवसाय करण्यातील सुलभता, शहरीकरण, रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क, मार्केटिंग कँपेन आणि इतर महत्त्वाचे घटक यांचा समावेश आहे.

सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, गोव्याचा पर्यटनासाठी राज्याचा खर्च, ब्रँडेड हॉटेल रूम्सची उपलब्धता, प्रति कॅपिटल जीएसडीपी आणि शहरीकरण या चार परिमाणांमुळे तिसरा क्रमांक लागला आहे.

भारतात ब्रँडेड हॉटेल्स पुरवण्यात गोव्याचा दुसरा क्रमांक लागतो असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आणि गेल्या चार सर्वेक्षणात राज्याने हे स्थान कायम ठेवले आहे. या सर्व प्रमुख घटकांमुळे गोवा हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे, पर्यटक, हॉटेलव्यावसायिक आणि प्रशासन अशा सर्वांसाठीच हे प्रमुख केंद्र आहे.

दिल्ली किंवा हरियानापेक्षा गोवा सर्वात लेझर ठिकाणांपैकी एक झाले आहे, कारण येथे ब्रँडेड हॉटेल रुम्सची उत्तम उपलब्धता आहे, हा अहवाल प्रसिद्ध होत असल्यापासून यात 14.0 टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय अहवालानुसार, हॉटेल उद्योगक्षेत्रासाठी किफायतशीर वाढ निदर्शनास आली आहे.

पर्यटनावरील राज्याच्या खर्चाच्या बाबतीत गोवा राज्याने 2016-17मध्ये सर्वात अधिक खर्च केला आहे. 0.673 टक्क्यांचा खर्च खास प्रवास आणि पर्यटनासाठी राखून ठेवण्यात आला आहे. गेल्या तीन अहवालांमध्ये सिक्कीमचा पहिला क्रमांक होता. गोव्याला तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर यायचे असेल तर सिक्कीम राज्याची जागा घ्यावी लागणार आहे.

ग्रॉस स्टेट डोमॅस्टिक प्रोडक्ट (जीएसडीपी) अंतर्गत, गोवा, दिल्ली आणि सिक्कीम आदींनी देशातील सर्वोत्तम तिसरे स्थान कायम ठेवले आहे. शहरीकरणाच्या मुद्द्यावर दिल्ली, गोवा आणि मिझोरम राज्यांनी असे अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे.

गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर म्हणाले की, गोवा टुरिझम पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहे.  पर्यटनाच्या विविध परिमाणांमधून गोवा राज्याने यश प्राप्त केले आहे. आम्ही प्रयत्नपूर्वक हे स्थान प्राप्त केले आणि आणि यापुढे जाण्यासाठी सर्व परिमाणामांवर अग्रणी पोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत.

आमच्या राज्यातील पायाभूत सुविधा, गुंतवणुक वाढवणे व सुधारणे, याशिवाय गोव्यात पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत. गोवा टुरिझम आणि जीटीडीसीने गोवा टुरिझमला ध्येयप्राप्तीसाठी मदत केली यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. येत्या काही वर्षांत गोवा टुरिझम सर्वच क्षेत्रांतील अग्रेसर पर्यटनाचे क्षेत्र बनणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष निलेश काब्राल म्हणाले, 2017 सालाने यंदा पुन्हा एकदा यशाचा टप्पा गाठला आहे. गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने नेहमीच विविध प्रकारे पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, यात पायाभूत सुविधा, वास्तव्य, पर्यटनाचे उपक्रम, पर्यटनाशी संबंधित विकास आणि इतर गोष्टींसाठी प्रयत्न केले आहेत. राज्यातील पर्यटन उद्योगक्षेत्र योग्य तऱ्हेने कार्यरत आहे आणि आपल्या स्पर्धकांशी सुयोग्य स्पर्धा करत आहे, ही परिस्थिती नक्कीच प्रोत्साहित करणारी आहे. येत्या काळात आम्ही नवीन विक्रम करू आणि पर्यटनाच्या सर्वच प्रकारात उच्चतम गुणांकन प्राप्त करू, याची मला नक्की खात्री वाटते.

LEAVE A REPLY

*