Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

गोव्यात काँग्रेसला धक्का; काँग्रेसचे दोन आमदार भाजपमध्ये

Share

नवी दिल्ली : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर उपचार सुरु असतानाच सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या काँग्रेसला भाजपाने धक्का दिला. काँग्रेसचे दोन आमदार भाजपाच्या गळाला लागले असून दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला. ते दोघेही लवकरच भाजपात प्रवेश करतील, असे सांगितले जाते.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेले अनेक दिवस आजारी आहेत. नुकतेच एम्समधून ते गोव्यात परतले. पर्रिकर यांची तब्येत पाहता त्यांचा उत्तराधिकारी आणि गोव्याचा नवीन मुख्यमंत्री नेमण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचे नेते विश्वजीत राणे यांच्या नावाची चर्चा आहे. पण यावरच आक्षेप घेत आम्ही लवकरच गोव्यात सत्ता स्थापन करू असा दावा काँग्रेसने काही दिवसांपूर्वी केला होता. आता हा दावा लवकरच फोल ठरेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे काँग्रेसमधील हे दोन आमदार भाजपमध्ये आल्यामुळे ४० जागांच्या गोवा विधानसभेत भाजपकडे १४ तर काँग्रेसकडे १६ आमदार झाले आहेत. सध्या २१ आमदारांसह एनडीए गोव्यात सत्तेत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!