पुढील ४८ तास इंटरनेट सेवा बंद होण्याची शक्यता

0
नवी दिल्ली : इंटरनेट युजर्सला येत्या ४८ तासांसाठी इंटरनेट उपलब्ध न झाल्याने नामुष्की ओढवू शकते. जगभरात येत्या ४८ तासांत इंटरनेट कनेक्टिविटी बंद होण्याची शक्यता आहे. मुख्य डोमेन सर्व्हरची येत्या काही तासांसाठी दैनंदिन देखभाल-दुरूस्ती सुरू राहणार आहे. रशिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तासांसाठी इंटरनेट युजर्सला नेटवर्क फेल्युअरच्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे कारण मुख्य डोमेन सर्व्हर्स आणि याच्याशी जोडलेले नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर काही तासांसाठी डाऊन राहणार आहे.

द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स एंड नंबर्स (ICANN) इंटरनेटसाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल करणार आहे. यामध्ये माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी क्रिप्टोग्राफी यंत्रणा वापरण्यात येते त्यासाठीच्या आवश्यक बाबींमध्ये बदल करण्यात येणार आहे. वाढत्या सायबर हल्ल्यांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.या बदलांमुळे पुढचे दोन दिवस वेबसाईट उघडणे किंवा इंटरनेटद्वारे व्यवहार करणं कठीण जाणार आहे. त्यामुळे जर महत्वाचे व्यवहार करायचे असतील तर ते आजच करून घ्या

LEAVE A REPLY

*