Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या हिट-चाट

ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई

Share
ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई, Glenn Maxwell engagement with vini raman india breaking news

देशदूत टीम डेस्क : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलने काही दिवासांपूर्वी विनी रमण या भारतीय वंशाच्या मुलीशी विवाह करणार असल्याचे जाहीर केले होते. तद्नंतर नुकटाच त्यांनी त्यांच्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियात शेअर केला आहे. विशेष म्हणजे भारतीय रितीरिवाजानुसार हा साखरपुडा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मॅक्सवेल आणि विनी यांनी भारतीय पद्धतीने साखरपुडा केला. गेल्या महिन्यात मॅक्सवेलने विनीला लग्नासाठी विचारणा केली होती. त्यानंतर त्यांनी साखरपुडाही केला होता. आता या दोघांनी भारतीय पद्धतीने साखरपुडा केला आहे. विनीने या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.

मॅक्सवेल आणि विनी गेल्या काही वर्षापासून एकमेकांना ओळखतात. या दोघांनी त्यांचे फोटो इंस्टाग्रामवरदेखील शेअर केले होते. भारतीय पद्धतीने केलेल्या साखरपुड्यासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!