गितेचा एकही श्‍लोक न वाचणारांना गितेवर टिका करण्याचा अधिकार नाही

0

महंत रामगिरी महाराज, गवळी शिवरा सप्ताहात भाविक भक्तीरसात चिंब

गंगापुर (विशेष प्रतिनिधी)- गिता हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. गितेचा एक ही श्‍लोक वाचला नसतांना, गितेवर टिका करण्याचा अधिकार नाही. असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले.
सद्गुुरु योगिराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह गंगापुर तालुक्यातील गवळी शिवरात सुरु आहे. या सप्ताहाच्या चौथ्या दिवशी च्या प्रवचनात महंत रामगिरी महाराज बोलत होते.

नागपुरच्या जिल्हाधिकार्‍याने गिते बद्दल वक्तव्य केले. त्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. त्या अनुषंगाने महाराजांनी कालच्या प्रवचनात या वक्तव्याचा चांगलाच समचार घेतला. गिता हा मोक्ष प्राप्त करुन देणारा ग्रंथ आहे. गितेवर टिका करणे हे पाप आहे. एका जिल्हाधिकार्‍याने या पवित्र ग्रंथावर टिका केली. यावर महाराजांनी एका कुत्र्याचा दृष्टांंत सांगितला. एका उच्च पदस्थ अधिकार्‍याने सन्माननिय पदावर असताने आपल्या मुळ स्वभावातील विकृती दाखविली. असे म्हणुन महाराज म्हणाले, समाज अशा व्यक्तींची गैर करणार नाही.

मानवाला जीवाचे कल्याण करावयाचे असेल तर त्याला वासना, मद्यपान, लोभ, मोह, राग, द्वेष, मत्सर मांसाहार वेशा गमन, या गोष्टीचा त्याग केल्याशिवाय सत्व गुणांची वृध्दी होणार नाही. त्याच बरोबर विकारावर विजय मिळविल्याशिवाय भगवंत प्राप्ती होत नाही. सत्ता, संपत्ती, तारुण्य, सौंदर्य या अविवेकी माणसाजवळ असल्यास त्याचा समाजाला त्रास होतो. जर विवेकी माणसाजवळ त्या असतील तर त्याचा समाजाला सद्पयोग होतो.

मन शुध्द करण्याकरिता काही प्रक्रिया आहे, अंतः करणामध्ये विकार घेऊन परमार्थ करत असतील तर त्यांना तुकाराम महाराज मूर्ख म्हणतात. ज्ञान मिळविण्याकरिता चित्तवृत्तीला स्थिर करण्याकरिता वासना, काम, क्रोध, लोभ मत्सर याचा त्याग करून इंद्रियावर विजय मिळवावाच लागतो. श्‍वासावर विजय मिळविल्याशिवाय मनावर विजय मिळविता येत नाही. आणि इंद्रियावर विजय मिळविता आला नाही तर ज्ञान प्राप्ती कशी होईल? ज्ञान प्राप्त झाले नाही तर सत्व गुणाची वृद्धी होणार नाही. आणि इंद्रियावर विजय मिळवायचा असेल चोरी, आलस्य, वेश्यागमन, मद्यपान,वासना या पंचविषयापासून दूर जावे लागेल.

अन्नावर सुसंस्कार असले पाहिजे. अन्न बनविणार्‍याचे संस्कार अन्नामध्ये येत असतात. आहारात सुगंध असावा, आहारात स्वाद असावा, स्वयंपाक बनविणारी सुगरण असावी, खाणार्‍याला भूक लागलेली असावी, आहार शुध्द सात्विक असाव तरच विचार, आचार शुध्द व सात्विक बनतील. दुर्योधनाचे दुषित अन्न खाल्याने भिष्माचायार्ंची बुध्दी भ्रमित झाली होती. म्हणून द्रोपदीला नग्न करण्याचा प्रयत्न झाला. तरी भिष्माचायार्ंनी विरोध केला नाही. राज धर्माचे पालन कसे करावे हे राजाला माहिती असावे.

आपल्या समोर अन्याय घडत असेल तर त्याला विरोध करून न्याय मिळवु द्यावा. राजाने प्रतिकार केला नाही तर ते एक प्रकारचे पापच आहे. राजा प्रजेचे शोषण करत असेल तर प्रकृतीचा नाश होतो. जिथे अन्याय होत असेल तर तिथे दुष्काळ पडतो, संसार करून परमार्थ करण्यातच संसारी माणसाला खरा आनंद आहे. संसारात मनुष्य जितके कष्ट घेतो तितके कष्ट भगवंत भक्ती मध्ये केले तर भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहानार नाही.

महंत भास्करगिरी महाराजांची भेट!
दरम्यान यावेळी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांंनी सप्ताह स्थळाला भेट देऊन स्वयंंपाक घर, प्रहारा मंडप, मुख्य व्यासपीठाला भेट दिली.महंत रामगिरी महाराजंांशी चर्चा केली. याप्रसंंगी म्हणाले कि, गंगागिरी महाराज मांचा 170 वा अखंड हरीनाम सप्ताह हा वारकर्‍यांंचा महाकुंंभच आहे. इथे साक्षात स्वर्गाला लाजवेल असा भक्तीचा मेळा आहे. अन्न दान हा सप्ताहाचा मुख्य गाभा आहे. सर्वसाधारण वारकर्‍याला भगवंंंंत भक्तीकडे नेण्यासाठी साप्ताह सहज सोपा मार्ग आहे.

या प्रसंगी वैजापुरचे माजी आमदार आर.एम. वाणी, सप्ताह समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब, उपाध्यक्ष संतोष पाटील जाधव, मधुकर महाराज, दत्तू खपके, प्रकाश मुथा, किरण पाटील डोणगावकर, कडूभाऊ काळे, संभाजी पाटील डोणगावकर, तुकाराम मिसाळ, नगर जिल्ह्यातील विठ्ठलदास असावा, अ‍ॅड. वसंतराव जगताप, अस्तगावकर सराफचे अशोक बोर्‍हाडे, नवनाथ महाराज आंधळे, नवनाथ महाराज म्हस्के, गणेश महाराज पिंपळवाडीकर, संदिप महाराज, चंद्रकांत महाराज सावंत, बहिरट महाराज, रमेश जवरे, बाबासाहेब चिडे, कापसे पैठणीचे बाळासाहेब चव्हाण, मिनीनाथ वर्पे, गणेश गव्हाणे, नामदेव निकम, यांचेसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*