Type to search

जळगाव

Video : गिरणा धरणातून १५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग

Share

चाळीसगाव| दि. १७ | प्रतिनिधी

नाशिक व गिरणा धरण परिक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तसेच ना शि क जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गिरणाधरणात मंळगवारी मध्यरात्री गिरसायंकाळी १० टक्के भरले असून पाण्याच्या विसर्गासाठी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. यातून १५००० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

गिरणा धरण ओव्हरफ्लो

गिरणाधरण शंभर टक्के भरले; दोन दरवाजे उघडले; १५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नाशिक व गिरणा धरण परिक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गिरणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

Deshdoot यांनी वर पोस्ट केले मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

गिरणा धरणाचे धरण क्षेत्रात पावसाचे सातत्य सुरुच असल्याने गिरणा धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. गिरणा धरणाने मंगळावारी शंभर टक्के भरले. तब्बल ११ वर्षांनतर गिरणा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्मिती झाली आहे. गिरणाधरण शंभर टक्के भरल्यामुळे चाळीसगांव तालुक्यासह भडगांव, पाचोरा, मालेगांव या तालुक्यांचा यापुढील काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याची आनंददायी वार्ता आहे.

नाशिक जिल्ह्यातील ठेंगोडा ३९ हजार क्युसेस, हरणबारी १६०० क्युसेस, केळझर ३०० क्युसेस, चणकापूर ८ हजार ८१ क्युसेस, पुनद १९०० क्युसेस आदि धरणातून पाण्याचा विसर्ग गिरणाधरणात सतात्या सुरु असल्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. आता पाण्याच्या विसर्गासाठी दोन धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून १५०० क्युसेसे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरवाजे दोन दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावा सर्तकतेचा ईशारा देण्यात आला आहे.

 

धरणाविषयी-
गिरणा धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता २१ हजार ५००दलफू असून मृत साठा तीन हजार दलफू आहे. एक हजार ४०० फूट दगडी तर एक हजार ७६० मातीचे बांधकाम आहे. धरणाची नदी पातळीपासूनची उंची १३३ इंच तर समुद्र सपाटीपासून १३१८ इंच आहे. १८हजार ५०० दलघफू उपयुक्त तर ३०० दलघफू मृतसाठा निर्धारित केला आहे. १३ हजार ५५० एकर बुडीत क्षेत्रात क्षेत्रात धरणाचा विस्तार व्यापला असून एक लाख ४१ हजार ३६४ एकर सिंचन क्षेत्राला धरणाने हिरवा साज दिलायं. कालव्यामुळे दोन लाख ६३ हजार ३७७ एकर क्षेत्र ओलिताखाली येते. शंभरी काढण्याचा कालावंधी-
गिरणा धरणाने गेल्या ५० वर्षात आठ वेळा शंभरी गाठली आहे. १९७३, १९७६, १९८०, १९९४ या अंतराने चार वेळा तर २००४ ते २००५, २००६, २००७ असे सलग चार वर्ष…असे एकुण आठ वेळा गिरणा धरणाने शतकी सलामी दिली आहे. आठ ते दहा वेळा ते ५० टक्क्यांहून अधिक तर १० वेळा ९० टक्के साठवण क्षमता ओंलाडली आहे. असून तब्बल ११ वर्षांनतंर शंभरी गाठली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!