Type to search

जळगाव

गिरणा धरण प्रकल्प ८० टक्के पुर्ण

Share

जळगाव –

जिल्हयातील सर्वात मोठा प्रकल्प असणारे गिरणा धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ८ ते १० वर्षात दमदार पाउस नसल्याने यावर्षी जुलैच्या अखेरपर्यत प्रकल्पात केवळ ७.१५ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. जुलैच्या शेवटच्या आठवडयात गिरणा उगमक्षेत्रात दमदार पाउस झाल्याने प्रथमच गिरणा पाणलोट क्षेत्रात ८० टक्क्यांपर्यत पाणीसाठा झाला आहे. यामुळे जिल्हा परीसरात ग्रामीण भागात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता बोलली जात आहे. मात्र सद्यस्थितीत दमदार पावसाअभावी अजूनही नदी नाल्यांमधून पाणी खळाळून निघाले नसल्याने जिल्हा परीसरातील विहीरींनी मात्र तळ गाठला असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

जिल्हा परीसरासह नांदगाव, मालेगाव, गिरणा पाणलोट क्षेत्रात सुरुवातीपासूनच दमदार पाउस झालेला नाही. केवळ कळवण, सटाणा तालुका परीसरातील गिरणा, मोसम व पूनद प्रकल्पातून पाणलोट क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे चणकापूर, हरणबारी, केळझरसह ठेंगोडा बंधारा ओसंडून भरल्याने पाणीसाठयात वाढ झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!