Type to search

Breaking News जळगाव

गिरणा धरणातून चार हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग : सर्तकतेचा इशारा

Share

चाळीसगाव । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग सतत सुरु असल्याने गिरणा धरण 100 टक्के भरले आहे. पाण्याच्या विसर्गासाठी मंगळपासून धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातही सततच्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने गुरुवार दि.19 रोजी दुपारी 12 वा. गिरणा धरणातील पाण्याचा विसर्ग 2500 क्युसेस वरुन 4 हजार क्युसेस करण्यात आला आहे.

धरण 100 टक्के भरल्यानतंर सुरुवातील 1500 क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. त्यानतंर बुधवारी 2500 क्युसेस पाण्या विसर्ग सुरु होता. तर गुरुवारी तब्बल 4 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग गिरणाधरणातून सुरु आहे.

गिरणा धरणाचे धरण क्षेत्रात पावसाचे सातत्य सुरुच असल्याने गिरणा धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. गिरणा धरणाने मंगळावारी शंभर टक्के भरले आहे.

नाशिक जिल्ह्यातील ठेंगोडा 39 हजार क्युसेस, हरणबारी 1600 क्युसेस, केळझर 198 क्युसेस, चणकापूर 661 क्युसेस, पुनद 983 क्युसेस आदी धरणातून पाण्याचा विसर्ग गिरणाधरणात सतात्या सुरु असल्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. आता पाण्याच्या विसर्गासाठी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून चार हजार क्युसेसे पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे नदीकाठच्या गावा सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

वलठाण धरण शंभर टक्के भरले !
पाटणादेवी डोगर परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने, डोंगरी नदीच्या पाण्याच्या पातळीत जबरदस्त वाढ झाली असून ती खळखळून वाहत आहे.त्यामुळे तालुक्यातील वलठाण धरणातील पाणी साठ्यात वाढ होवून ते 100 टक्के भरले आहे. धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून आता विहिरींच्या पाणी साठ्यात देखील वाढ होणार आहे. तसेच तालुक्यातील जवळपास सर्व लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सतत पावसामुळे पाणी खळखळून वाहत आहे.

अशी आहे, ल.प.बंधार्‍यांतील पाण्याची पातळी
हातगाव शून्य टक्के, खडकिसीम 100टक्के, प्रिंपरी उबरहोळ शून्य टक्के,वाघळा 1- 94.43 टक्के, ब्राह्मण शेवगा शून्य टक्के, पिंपरखेड 89.62 टक्के, कुंझर 2-100 टक्के, वाघळा 2- 97.02 टक्के, बोरखेडा शून्य टक्के, वलठाण 100 टक्के, राजदेहरे 98.03 टक्के, देवळिभोरस शून्य टक्के, पथराड 78.88 टक्के, क्रिष्णापूरी 76.09 टक्के पाणी साठा आज घडली उपलब्ध झाला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!