बोहल्यावर चढण्यापूर्वीच मुलीची आत्महत्या

0
नाशिकरोड । देवळालीगाव येथे राहणार्‍या 22 वर्षीय मुलीने बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्या केल्याचा प्रकार घडला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वैष्णवी विजय शिरसाठ असे मृत मुलीचे नाव असून काही दिवसांपुर्वीच तिचा साखरपुडा झाला होता. पुढील महिन्यात तिचा विवाह होणार होता. परंतु त्या आधीच तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

या प्रकारामुळे देवळालीगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून वैष्णवीच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान मृत वैष्णवी हिच्यावर शोकाकुल वातावरणात काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*