Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

साडेतीन वर्षीय बालिका बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी

Share

लखमापूर | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली आहे. ईश्वरी राजेंद्र रेहरे असे या बालिकेचे नाव आहे.

सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला करत जखमी केले. या हल्ल्यात बालिका गंभीर असून तिच्यावर प्राथमिक उपचार करून नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लखमापूर येथील हनुमानवाडीत ही घटना घडली. ईश्वरीच्या मानेजवळ गंभीर जखम झाली असल्याची माहिती मिळत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!