दादर पोलीस वसाहतीत लागलेल्या आगीत मुलीचा होरपळून मृत्यू; तीन घरांचे नुकसान

0

मुंबई | मुंबईतील दादर पोलीस वसाहतीत आज दुपारी लागलेल्या आगीत एका मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची  माहिती मिळाली आहे.

पाच मजली असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. सिलिंडरचा स्फोट होऊन आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत तीन घरांचे नुकसान झाले होते.

दादरच्या परिसरात असलेल्या पोलीस वसाहतीला आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

LEAVE A REPLY

*