Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

भिंत पडून बालिकेचा मृत्यू ; 153 घरांची पडझड

Share

नाशिक । प्रतिनिधी

जोरदार वृष्टीमुळे सोमवारी (दि.5) नाशिक तालुक्यातील मौजे दुगाव येथ संघराणी वाघ (8) या बालिकेचा अंगावर भिंत पडून मृत्यू झाला. तर तीन वेगवेगळ्या घटनात तीनजण वाहून गेले असून त्यांचा अदयाप पत्ता नाही. मागील तीन दिवसात जिल्ह्यात 153 घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, सटाण्यातील खमताने येथील आरंभ नदीत अडकलेल्या मछिन्द्र गायकवाड या युवकाला वाचविण्यात बचाव पथकाला यश आले. तर,जोगलटेंभी येथे रविवारी रात्रीपासून पुरामुळे मंदिरात अडकलेला पुजारी अन् झाडावर अडकलेला जीवरक्षकला देखील वाचविण्यात आले.

1969 सालानंतर प्रथमच गोदामाईला महापूर आला. े गोदाकाठच्या भागात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. शहरासह चांदोरी, सायखेडा, शिंगवे या निफाडमधील गावांनाही चांगलाच तडाखा बसला. नाशिक तालुक्यातील दुगांव येथील 8 वर्षी संघराणी हिच्यावर घरांची भींत पडल्याने मृत झाला.

तर सोमवारी सकाळी लाखलगाव जवळ वालवी नदीत पाय घसरल्याने परशराम अनवट ही 47 वर्षीय व्यक्ती वाहून गेली आहे. सायंकाळी 4.30 वाजेच्या दरम्यान शहरातील अमरधाम परिसरात नदीत आकाश लोंढे नामक युवक वाहून गेला आहे. तर संजय वालारे ही व्यक्ती नंदीनी नदीत वाहून गेली आहे. वाहून गेलेल्या व्यक्ती अद्यापही बेपत्ता असून, त्यांचे शोध कार्य सुरु आहे.

तर सटाण्यामध्ये खमताने येथील मछिन्द्र पिंपळसे हा युवक आरंभ नदीच्या पुरात अडकला होता. त्यास बचाव पथकाने सुरक्षितरीत्या वाचवले. त्याला वाचविण्यासाठी लष्कराचे चॉपर मागविण्यात आले होते. मात्र, खराब वातावरणामुळे त्याचा उपयोग करता आला नाही. पडझड झालेल्या घराचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

जोगलढेंभीत पुजार्‍यास वाचवले

गोदावरी आणि दारणा या दोन्ही नद्यांच्या संगम असलेल्या जोगल टेंभी मंदिरात पुराच्या पाण्यात पुजारी अडकले होते. त्यास वाचविण्यासाठी गेलेला जीवरक्षकही संकटात सापडला व तो झाडावर अडकला.या दोघांना सोमवारी सकाळी भोसला अ‍ॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या संतोष वाबळे, चैतन्य जोशी, सुजीत पंडित, योगेश सहारे, विक्रम बेेंडकुळे या सहां जनांच्या पथकाने बाहेर काढले.

घराची पडझड
पेठ – 43
इगतपुरीत – 29,
त्र्यंबकेश्वरमध्ये – 22,
सिन्नर – 21
कळवणमध्ये – 20
बागलाण – 13
सुरगाणा – 5

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!