Video : हिम्मत असेल तर बोट लावून दाखवा; तरुणीचे राम कदमांना ‘चॅलेंज’

0
मुंबई | दहीहंडी उत्सवात भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर सर्व स्तरातून आमदार कदम यांच्यावर टीका केली जात आहे. आज पुण्यातील एका तरुणीनेही आमदार कदमांना खुले आव्हान देत एक व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. काही वेळातच या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून हजारो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ बघितला आहे.

दहीहंडीच्या दिवशी भाजपा आमदार राम कदम यांचा जीभेवरचा ताबा सुटला. उद्या मला सांगितले की, एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे, ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की, मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन असे बेताल वक्तव्य आमदार कदम यांनी केले. याच वक्तव्याला आव्हान देत मीनाक्षी डिंबळे पाटील या तरुणीने एक व्हिडीओ पोस्ट केला.

या व्हिडीओ मध्ये ही तरुणी म्हणते, राम कदम तुम्हाला मी चॅलेंज करते, मला तुम्ही मुंबईला बोलवा किंवा मी मुंबईत येते. आल्यानंतर मला फक्त बोट लाऊन दाखवा, उचलून न्यायची गोष्ट तर लांबच राहिली. त्याबद्दल मी नंतर बघते. तुम्ही जे वक्तव्य ते अत्यंत लांछनास्पद आहे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे इथे स्त्रियांचा आदर केला जातो. स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात.

त्यामुळे तुमच्या या घाणेरड्या वक्तव्यांची महाराष्ट्रात जागा नाही. तुम्ही जे बोलला आहात त्याबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची आहे आपण आमनेसामने भेटून बोलू. तुम्हाला मी फोन केला होता पण तुम्ही उचलला नाही. आता तुमच्या फोनची मी वाट बघते आहे. तुम्ही फोन करा आणि माझे चॅलेंज स्वीकारा अशीच माझी अपेक्षा आहे. असे या तरुणीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये या तरुणीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*