Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

370 कलम रद्द : गिरिश भाऊंनी वाजवला ढोल भाजपाकडून जल्लोष

Share

नाशिक । प्रतिनिधी

जम्मू आणि काश्मीरातील 370 कलम रद्द करुन हा भाग देशाशी जोडून भाजपाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जनतेला दिलेले वचन भाजपाने पूर्ण करुन दाखविले. कॉग्रेसने रामजन्म भूमी, तिहेरी तलाक देशाशी निगडीत महत्वपूर्ण प्रश्नावर कधीही निर्णय घेतले नाही, या शब्दात पालकमंत्री तथा भाजप नेते गिरिश महाजन यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. यावेळी त्यांनी वसंतस्मृती कार्यालय येथे पक्ष पदाधिकार्‍यासोबत ढोल वाजवून या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा केला.

केंद्र शासनाने भारतीय राज्य घटनेतील जम्मू काश्मिरबाबत विशेष तरतूदी असणारे कलम 370 रद्द केल्यानंतर देशभरात नागरिकांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. नाशिक मुक्कामी असलेल्या पालकमत्री महाजन यांनी ढोलताशा वाजवत निर्णयाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काश्मीरचा प्रश्न भाजपच्या दृष्टीने महत्वाचा होता. 1984 ला पक्षाचे दोन खासदार असतानाही आमची हीच भुमिका होती आणि आज देखील तीच आहे. अखेर आम्ही या प्रश्नी निर्णायक भूमिका घेतली.

राज्यसभेत कॉँग्रेसच्या भूमिकेने त्यांचे पितळ उघडे पडले अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की,भविष्यात अशाच पध्दतीचे निर्णय घेतले जातील. चांगल्या प्रश्नांचे राजकारण करणे थांबवावे असेही ते म्हणाले.

देशवासियांच्या मनात असलेला प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी सोडविला आहे. ही घटना देशाच्या ईतिहासात सुवर्णाक्षणांनी लिहीली जाईल. या कलमाचा आधार घेउन काश्मिरमध्येे अराजकता निर्माण केली जात होती. दहशतवाद पोसला जात होता असेही ते म्हणाले. यापुढे देशाच्या अखंंडतेशी हेळसांड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!