Friday, May 3, 2024
Homeनगरगिडेगावच्या अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ल्याप्रकरणी चुलत्याला अटक

गिडेगावच्या अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ल्याप्रकरणी चुलत्याला अटक

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

तालुक्यातील गिडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर हल्ला प्रकरणी नेवासा पोलिसांनी मुलीच्या चुलत्याला अटक केली आहे.

- Advertisement -

दि.27 जून रोजी दुपारी नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथील सहावीत शिकणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून गंभीर केले. याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबावरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुलगी घरात एकटी असताना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून तिच्या डोक्यावर, उजव्या व डाव्या हातावर तसेच तोंडावर व ओठावर वार केले. या घटनेला 15 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही पोलीस यंत्रणेला धागादोरा मिळत नव्हता. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपअधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, तपासी अधिकारी उपनिरीक्षक भारत दाते यांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला.

तपासाअंती या अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या चुलत्यानेच हल्ला केल्याचे निष्पन्न झाल्याने नेवासा ठाण्यात गुरनं. 367/20 भादंवी कलम 307 व अन्य कलमांन्वये 26 जून रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यातील ‘अज्ञात’ व्यक्ती शोधण्यात पोलिसांना यश आले. मुलीवर चाकूने वार करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आरोपीला दि. 12 रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत दाते करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या