Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

घोटी- त्र्यंबकेश्वर रस्ता बनला मृत्युचा सापळा; सा.बां.विभागाचे दुर्लक्ष

Share

आहुर्ली : मुंबई-ठाणेसह गुजरातला घोटी-आहुर्ली मार्गे त्र्यंबकेश्वर या रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. आवळी-आहुर्ली गावाजवळील मार्गावरिल रस्त्याच्या खालचा भराव ढासळला असुन हा मार्ग चक्क मृत्युचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरुन वाहन चालक अक्षरश: जीव मुठीत धरुन वाहने चालवत आहे. महत्त्वाचा मार्ग असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज असून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

यंदा झालेल्या अतिवृष्टीने या मार्गावर खड्यांनी रस्ते परिपूर्ण झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे आहे कि खड्डयात रस्ता हेच वाहनचालकानां कळेनासे झाले झाल्याने अपघात होण्याची संभावना वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आवळी-आहुर्ली गावाजवळील मार्गावरिल रस्त्याच्या खालचा भराव ढासळला आहे. दोन्ही बाजुला खोल दरी असल्याने उतारावरिल हे ठिकाण अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. मात्र एवढी विदारक स्थिती असतानांही सा.बांध.विभागाचे मात्र याकडे गंभीर दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहे.

तातडीची दुरुस्ती वा उपाययोजना तर दुरच मात्र या रस्त्यावरुन ये जा करणार्या वाहनानां किमान सावधगिरीची सुचना देणारा एखादा फलकही लावण्याची तसदी ही घेण्यात आलेली नाही असे दिसुन येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!