घोटीत वाहतूक पोलीस गायब; रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

0

इगतपुरी  तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेले घोटी शहरातील वाहतुकीचा प्रश्न चांगलाच निर्माण झाला असून नागरिकांना या वाहतूक कोंडीचा  रोजच सामना करावा लागत आहे.

नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा वाहतूक शाखेने घोटी शहरासाठी नेमलेले दोन्ही वाहतूक पोलीस वाहतूक कोंडीच्या वेळी गायब असतात अशी येथील रहिवाशी सांगतात. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सक्षम पोलिसांची  नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.

इगतपुरी तालुक्यातील प्रमुख व्यापारी बाजारपेठ असणाऱ्या घोटी बाजारपेठेतून जाणाऱ्या जुन्या महामार्गावरच बाजार भरत असल्याने रस्त्यावर भरणाऱ्या या बाजारामुळे शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. तसेच शहरातील भंडारदरा चौक ते रेल्वे फाटका पर्यंत ही वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे.

दरम्यान, शहराची ही वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यात यावी यासाठी सर्वच राजकिय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी सातत्याने पाठपुरावा करूनही वाहतूक पोलिसांनी दखल न घेतल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस घोटीकरांची डोकेदुखी ठरते आहे.

वाहतूक पोलीस गायब : दरम्यान वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी तत्कालीन पोलीस प्रमुख अंकुश शिंदे यांनी स्थानिक वाहतूक पोलिसांवर कामाचा असलेला ताण कमी करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेवर जबाबदारी देऊन प्रत्येक पोलीस स्टेशनला दोन वाहतूक कर्मचारी नेमले आहेत.

यानुसार घोटी पोलीस स्टेशनलाही दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.मात्र हे नेमलेले पोलीस कर्मचारी आठवडे बाजाराच्या दिवशी किंवा वाहतूक कोंडीच्या वेळी दुर्लक्ष करून महामार्गावर कर्तव्य बजाविण्यात धन्यता मानतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे अशी मागणी होते आहे.

LEAVE A REPLY

*