Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : घोटी टोल नाक्यावर ‘यलो लाईन’ नियमाची पायमल्ली

Share

इगतपुरी : पिवळ्या रेषेच्या पल्याड वाहनांची रांग लागल्यास टोल वसुली न करता वाहनं सोडायची असा नियम आहे. मात्र, घोटी येथील टोलनाक्यांवर हा नियम पाळला जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे या टोलनाक्यावर यलो लाईन नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे.

इगतपुरीतील घोटी टोल नाक्यावर सध्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. रात्रीच्या वेळी विशेष करुन वाहनांची गर्दी अधिकच वाढत असुन वाहनांना टोल नाका ओलांडण्यासाठी २५ ते ३० मिनिटांचा कालावधी लागत आहे. विशेषता मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे.

शासनाच्या निर्णयानुसार कोणत्याही टोल नाक्याला गर्दी वाढल्यास व वाहनांना टोल पार करण्यासाठी तीन मिनिटांपक्ष्या जास्त वेळ लागत असेल तर वाहने टोल न घेता सोडली पाहिजे. तसा आदेशच शासनाने काढला आहे, असे असले तरी त्या नियमाची पायमल्ली घोटी येथील टोल नाक्याला होतांना दिसत आहे.

टोल वसुलीमुळे विविध महामार्गांवर वाहतुकीची रोजच्या रोज कोंडी होते. त्यामुळं वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणावर वाया जाते. या विषयच्या सततच्या तक्रारीनंतर त्यावर उपाय म्हणून टोलनाक्यांवर पिवळ्या रेषेचा नियम करण्यात आला. त्यानुसार, टोलनाक्यापासून १० वाहने उभी राहतील इतक्या अंतरावर एक पिवळी रेषा आखण्यात आली आहे. परंतु या नियमाचे सर्रास उल्लंघन होतांना दिसत आहे. कित्येक वाहनचालकांनी तक्रार करुन देखील टोल प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करित आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!