Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

घोटी : अज्ञातांकडून बाप लेकांचा निर्घृण खून; तालुक्यात खळबळ

Share

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथे शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास बाप आणि लेकाचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वाडीवऱ्हे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासकार्य वेगाने सुरू केले आहे. काशीराम वामन फोकणे (वय ६५), ज्ञानेश्वर काशीराम फोकणे (वय ४८) असे निर्घृण खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ज्ञानेश्वर फोकणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी होते.

अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ह्या अत्यंत छोट्या गावी ज्ञानेश्वर काशीराम फोकणे हे पत्नी आणि तीन मुलगे यांच्यासह राहत होते. मळ्यात त्यांची शेती असून वडील काशीराम वामन फोकणे हे एकटे मळ्यात राहायचे. ज्ञानेश्वर फोकणे यांनी एसएमबीटी परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू केला असून त्यांचा संपूर्ण परिवार तेथेच वास्तव्यास आहे.

दररोज आपल्या वडिलांना जेवण घेऊन कोणी ना कोणी मळ्यात येत असत. शुक्रवारी रात्री १० च्या वेळी ज्ञानेश्वर फोकणे वडिलांना जेवणाचा डबा घेऊन आले होते. मात्र रात्री दीडच्या सुमारास त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी मळ्यात हल्ला करून खून केला. यावेळी त्यांचे वडील काशीराम फोकणे यांचाही निर्घृण खून झाला. ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

वाडीवऱ्हे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला वेगाने सुरुवात केली आहे. घटनेच्या कारणांचा आणि अज्ञात व्यक्तींच्या शोधाचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ह्या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!