दारणा नदीपात्रालगतच्या नागरिकांचा जीवघेणा प्रवास

0

कावनई ता.17 वार्ताहर :  घोटीजवळील देवळे येथील दारणा नदीवरील पुलाचा शनिवारी कोसळून भगदाड पडल्यानंतर घोटी शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावाचाही घोटी शहराशी संपर्क तुटला आहे.

केवळ पुलाच्या लगत असणाऱ्या देवळे गावातील नागरिकांना घोटीला येण्यासाठी पंधरा ते वीस किलोमीटर अंतराचा वळसा मारून यावे लागते.

या पुलावरील सर्वच वाहतूक शनिवार पासून बंद करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून घोटी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावातील नागरिकांना याची झळ बसत आहे.

या भागातील नागरिकांना दुचाकीवरून अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. देवळे येथीलच जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून दुचाकीस्वाराना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान या पुलावरील भगदाड दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून पुलाला बेरिंग टाकण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे.

पूल सुरू होण्यास १० ते १२ दिवस अवधी   

सदर पूल दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत असून,पुलावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अजून दहा ते बारा दिवस लागतील.मात्र तरीही पूल वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही याची चाचणी करून या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येईल. – विलास आव्हाड (सहा. अभियंता)

चार महिन्यापूर्वी या पुलाच्या डागडुजीचे काम संशयास्पद होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर आपण कामाला हरकत घेतली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेता, हे काम नित्कृष्ट आणि अर्धवट ठेवल्याने ऐन पावसाळ्यात या पुलाला भगदाड पडून पूल बंद करण्याची वेळ आली आहे. -शिवा काळे, समता परिषद तालुकाध्यक्ष

LEAVE A REPLY

*