Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

घोटी- इगतपुरी तालुक्यात मुसळधार; अनेक गावांचा संपर्क तुटला

Share

जाकिर शेख। घोटी : घोटी – इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अद्यापही पाऊस थांबन्याचे नाव घेत नाही.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चार दिवसापासून अतिवृष्टी होत असल्याने तालुक्यात सर्वच नद्या ओव्हरफ्लो होऊनमोठ्या प्रमाणात ओसांडून वाहत आहेत.त्यामुळे नदीपात्रालगतच्या गावांना पुर पाण्याने वेढा दिला आहे पश्चिम पट्यात तर अनेक गावांच्या भातशेती पाण्याखाली गेल्याने जलमय स्थिति निर्माण झाली आहे.

गेल्या ४८ तासापासून सुरु असलेल्या अतिवृष्टिमुळे तालुक्यातील सर्वच धरने जवळपास भरली असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील अप्पर वैतरना धरणही आज “ओव्हरफ्लो” झाले आहे. सर्वच धरणातून हजारो क्यूसेसचा विसर्ग सुरु आहे त्यामुळे दारणा जलाशयालगतच्या गावांना व दारणा नदीपात्रा लगतच्या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिल्याचे चित्र दिसून येत आहे.

घोटी- सिन्नर महामार्गवारील शेनित पुलावरुन पाणी असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे तर मुंढेगाव- अस्वली मार्गावरील अस्वली जवळच्या पुलावर पुरपाण्याचा चढउतार सुरु आहे तर वाकी- पिंपळगाव भटाटा मार्गवर असलेल्या पुलावरुनही पुराचे पाणी असल्याने येथील जनसंपर्क तुटला आहे. घोटी -काळुस्ते मार्गावरही पुलाला पाणी लागले आहे.

घोटी, इगतपुरी, काळुस्ते, टाके, त्रिंगलवाडी, पिंपरीसदो, मानवेढे, परिसरातील सर्वत्र गावालगतच्या शेतजमिनी पाण्याखाली आल्याने भातशेती पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे तर घोटी टोलनाका पासून पुढे कसारा घाटापर्यंत दिवसाही पूर्णपणे धुके असल्याने पाऊस व धुके यांचा सामना करत वाहनचालकांची मोठी कसरत सुरु होती. दारणेच्या पुरामुळे नदीपात्रालगतच्या परिसरही पुरपाण्याने व्यापला आहे

इगतपुरी तालुक्यात दारणा धरणातून आज सकाळी १९ हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरु होता तर दुपारनंतर तो २३ हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरु होता तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणाधरणातूनही ९२०० क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ भावली धरणातुन १५०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे त्यापाठोपाठ भाम, वाकी, कडवा या धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

गेल्या १२ दिवसापासून तालुक्यात विक्रमी पाऊस पड़त असून आजही २४ तासात २१२ मिमी पाऊस झाला आहे तालुक्यात आजपावेतो अवघ्या २० दिवसात ३०२२ मिमी पाऊस झाला असून एकूण सरासरीच्या ९२ टक्के पाऊस झाला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!