Type to search

Featured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

घोड, कुकडीचे पाणीवाटप ; अण्णांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात पाणी परिषद

Share

श्रीगोंदा(प्रतिनिधी) – तालुक्यातील घोड आणि कुकडी प्रकल्पाच्या पाणीवाटपाच्या अनुषंगाने रविवारी 16 जून रोजी पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगोंदा येथे विविध विषयांवर पाणी परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दिली.

रविवार दिनांक 16 जून रोजी श्रीगोंदे येथील तुळशीदास मंगल कार्यालयात पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली व पोपटराव पवार व कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाटपाणी परिषद घेण्यात येऊन तालुक्याला वरदान ठरलेले दोन कालवे आहेत त्याच्या माध्यमातून श्रीगोंदे तालुक्यातील 70 टक्के शेती ओलिताखाली आली. परंतु आज परिस्थिती पाहिली असता श्रीगोंदे तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यात काही ठिकाणी प्यायला पाणी उपलब्ध नाही. कुठेतरी आता पाणी देण्याच्या नावाखाली सोडलेल्या पाण्यामुळे फळबागाचा प्रश्न काही ठिकाणी मार्गी लागला असला तरी आज भयानक परिस्थिती आहे. सगळ्याचा जर विचार केला तर आपल्याला येणारा भविष्यकाळ फारच धोक्याचा आहे. उद्याच्या कालखंडामध्ये कुकडीच्या आणि घोडच्या क्षेत्रातल्या लोकांनी जर विचार केला तर अधिकारी आणि शेतकरी यांचा समन्वय होऊन आपल्या सगळ्यांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा त्याचबरोबर पश्चिमेकडे जाणारे पाणी जर पूर्वेकडे वळवलं तर तालुक्याला दोन ते तीन टीएमसी पाण्याचा पाणी साठा वाढीव मिळू शकतो.

पाण्यामध्ये राजकारण येऊ नये ही भावना डोळ्यासमोर ठेऊन तालुक्याचे माजीमंत्री बबनराव पाचपुते असतील किंवा तालुक्याचे आमदार राहुल दादा जगताप, श्रीगोंदे साखर कारखान्याचे चेअरमन राजू नागवडे यांच्याबरोबरच तालुक्यातील सगळ्या पुढार्‍यांनी राजकारण बाजूला ठेवून पाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण तहान लागल्यानंतर उपायोजना करणे योग्य नाही म्हणून आता ही योग्य वेळ आहे. आलेला काळ आपल्या दृष्टीने फार धोक्याची घंटा घेऊन आलेला आहे पण भविष्यकाळ चांगला जावा म्हणून पाणी परिषदेच्या माध्यमातून आपली शेतकर्‍यांना एकच विनंती आहे उद्याच्या पाणी परिषदेच्या माध्यमातून सगळ्याला माझी विनंती आहे या उद्याच्या परिषदेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!