Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

सर्वोच्च न्यायालाचे आदेश प्राप्त न झाल्याने सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर शुक्रवारी मकाज

Share

जळगाव – प्रतिनिधी

घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेशदादा जैन यांनी दाखल केलेला अर्ज मान्य करीत सर्वोच्च न्यायालयाने जैन यांच्या बाबतचे प्रकरण सुनावणीसाठी मुंबई खंडपीठाकडे वर्ग केल्यामुळे या बाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सादर करण्यासाठी बुधवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बुधवारी देखील खंडपीठाला प्राप्त न झाल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता शुक्रवार दि.८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्यात औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेले कामकाज या पुढे मुंबई खंडपीठात चालविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेशदादा जैन यांनी याबाबत सर्वोच न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांनी अर्जाद्वारे घरकुलचे कामकाज औरंगाबाद वगळता इतरत्र कोणत्याही खंडपीठात चालविण्याची मागणी केली होती.

याबाबत मंगळवारी घेण्यात सुनावणी घेण्यात आली. मंगळवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी या प्रकरणात पुढील कामकाज मुंबई खंडपीठात चालविण्याचे आदेश दिल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दाखल करण्यासाठी बुधवारी सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान बुधवारी देखील आदेश प्राप्त न झाल्यामुळे या प्रकरणात आता शुक्रवारी पुढील सुनावणी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

घरकुल घोटाळ्यात धुळे येथील विशेष न्यायालयाने एकूण ४८ आरोपीना शिक्षा सुनावली आहे. दरम्यान या घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेशदादा जैन यांना १०० कोटी दंड आणि ७ वर्षे कारावासाची शिक्षा न्यायालयाने दिली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पर्यंत एकूण ३९ आरोपींचे जामीन मंजूर झाले आहेत.

तर मुख्य आरोपी सुरेशदादा जैन, राजा मयूर, नाना वाणी, प्रदीप रायसोनी, यांचेसह ५ जणांना अद्याप जमीन मंजूर करण्यात आलेले नाहीत. दरम्यान या प्रकरणाशी सबंधित सर्व कामकाज मुंबई खंडपीठात एकत्रितपणे चालविण्यात यावेत अशी मागणी करणारा अर्ज विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केला आहे. या प्रकरणाशी सबंधित अर्धे कामकाज औरंगाबाद आणि अर्धे मुंबई येथे चालल्यास आरोपीसह वकिलांची यात दमछाक होणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!